• Download App
    पवार - भाजप संबंध : प्रकाश आंबेडकर वक्तव्यावर ठाम; भाजपसोबत जायला तयार, पण त्यांनी मनुस्मृती सोडावी!! Stick to Prakash Ambedkar statement; Ready to go with BJP, but they should leave Manusmriti

    पवार – भाजप संबंध : प्रकाश आंबेडकर वक्तव्यावर ठाम; भाजपसोबत जायला तयार, पण त्यांनी मनुस्मृती सोडावी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शरद पवार आणि भाजप यांचे संबंध आहेत या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर आजही ठाम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना कितीही घेरले असले तरी प्रकाश आंबेडकर यांनी आपले वक्तव्य मागे घेतलेले नाही. उलट त्यात आपण स्वतः भाजपबरोबर जायला तयार असल्याची भर घातली आहे. Stick to Prakash Ambedkar statement; Ready to go with BJP, but they should leave Manusmriti

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने मनुस्मृती सोडावी. आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

    शरद पवार यांचे आजही भाजपशी संबंध असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले होते. याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पवारांबाबतचेच माझे वक्तव्य भूतकाळातील अनुभवावरून आहे. मला त्यांचा जो राजकीय अनुभव आला त्यावरूनच मी ते बोललो. आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखायला हवे, असा टोलाही त्यांनी हाणला.

    कोणीही दुश्मन नाही

    प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कुठलाही राजकीय पक्ष एकमेकांचा दुश्मन नाही. जे कार्यकर्ते, नेते, मतदार आहेत, त्यांनी हे समजून घ्यावे. भारतीयांमध्ये दुश्मनी असू सकत नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. ते मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत कार्य करायला तयार असतील, तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत. जे बाबासाहेबांनी महाडला केले, ते मोहन भागवतांनी नागपूरला करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    राऊतांना दिले उत्तर

    शरद पवार हे देश तसेच राज्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे पवारांविषयी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून बोलावे. शरद पवार हे भाजपचेच त्यांचे हे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. मविआ नेत्यांबद्दल बोलतानाही प्रकाश आंबेडकर यांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, संजय राऊत यांनी दिलेला सल्ला मला उद्धव ठाकरेंनी दिला तर मानेन, असे उत्तर त्यांनी दिली.

    भाजप भांडणे लावते

    प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आत्ताची युती शिवसेना-बंचित बहुजन आघाडीचीच झालीय. उद्धव ठाकरेंचे वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला कन्वीन्स करताहेत. आपण त्यांच्या प्रयत्नाला किती यश येईल हे पाहू. मात्र, आपण एकमेकांशी बोलले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. भाजप भांडणे लावायला कोणत्याही थराला जाईल, असा दावाही त्यांनी केला.

    ‘एमआयएम’सोबत युती नाही

    प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पक्ष जिंकण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. लोकशाही वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर आम्ही ‘एमआयएम’बरोबर युती करणार नाही. त्यांना एक खासदार दिल्यानंतर वाट्याघाटीमध्ये व्यवस्थित बोलले पाहिजे होते. त्यांचा आग्रह 100 जागांचा होता. हे पॉलिटिकली चूक आहे.

    Stick to Prakash Ambedkar statement; Ready to go with BJP, but they should leave Manusmriti

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस