Narendra Modi temple in Pune : नुकतंच देशभरात चर्चेत आलेलं पुण्यातील मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील समर्थकाने औंध परिसरात हे मंदिर उभारलं होतं. परंतु आता या मंदिरातील नरेंद्र मोदी यांची मूर्ती हटवण्यात आली आहे. थेट पंतप्रधान कार्यालयातून आदेश आल्यामुळे त्या समर्थकाने ही मूर्ती हटवल्याचं सांगितलं जात आहे. statue removed from Narendra Modi temple in Pune, After phone call came directly from the Prime Ministers Office
विशेष प्रतिनिधी
पुणे : नुकतंच देशभरात चर्चेत आलेलं पुण्यातील मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील समर्थकाने औंध परिसरात हे मंदिर उभारलं होतं. परंतु आता या मंदिरातील नरेंद्र मोदी यांची मूर्ती हटवण्यात आली आहे. थेट पंतप्रधान कार्यालयातून आदेश आल्यामुळे त्या समर्थकाने ही मूर्ती हटवल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपचा संबंध नसल्याचं स्पष्ट
पुण्यातील औंध परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. भाजप कार्यकर्ते मयूर मुंडे यांनी मोदींचं हे मंदिर उभारलं होतं. हे मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दीसुद्धा होऊ लागली होती. अनेक जण तेथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. तथापि, या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
जयपूरहून आणला होता पुतळा
भाजप कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध परिसरातील परिहार चौकात हे मंदिर उभारलं होतं. या मंदिरात मोदी यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मयूर मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपये खर्चून पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिव्यांशू तिवारी यांच्या मार्फत जयपुरातून हा पुतळा तयार करून घेतला होता.
दरम्यान, आता थेट पीएमओमधून फोन आल्यानंतर एका रात्रीतून हा पुतळा हटवण्यात आला आहे. उत्साही कार्यकर्ते नेहमीच आपल्या नेत्यावरील श्रद्धेमुळे असे काहीतरी भव्यदिव्य करण्याचा प्रयत्न करत असतात. दुसरीकडे, नेत्यांना मात्र अशा प्रकाराची पुसटशी कल्पनाही नसते. विरोधकांनी तर मोदी मंदिरासाठी भाजपवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली होती. आता मात्र हे मंदिर पुतळा हटवल्यामुळे ओस पडलं आहे.
statue removed from Narendra Modi temple in Pune, After phone call came directly from the Prime Ministers Office
महत्त्वाच्या बातम्या
- शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कोचला अयोध्येला येण्याचे निमंत्रण का दिले…?? वाचा…
- पंधरा महिन्यांत १६ दहशतवाद्यांचा ‘एन्काउंटर’; ‘ त्या’ चक्क एके-४७ बंदूक घेऊन घालतात गस्त
- लॉकरचे नवे नियम : रिझर्व्ह बँकेकडून बँकांना सूचना, काय बदल होणार, वाचा सविस्तर…
- अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने भारताबरोबरची आयात-निर्यात केली बंद, व्यापाऱ्यांना मोठा फटका