• Download App
    राज्याचा केंद्राकडे १८ हजार कोटींचा प्रस्ताव : विकासकामांसाठी पूर्ण निधी मिळण्याचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास|State's proposal of 18 thousand crores to the Center Chief Minister Shinde is confident of getting full funds for development works

    राज्याचा केंद्राकडे १८ हजार कोटींचा प्रस्ताव : विकासकामांसाठी पूर्ण निधी मिळण्याचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे विकासकामांसाठी 18 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्यात सर्वसामान्यांचे भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्यामुळे केंद्राकडून आम्हाला हा पूर्ण निधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केला.State’s proposal of 18 thousand crores to the Center Chief Minister Shinde is confident of getting full funds for development works

    पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर होते. यानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारतर्फे केंद्राकडे केलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली.



    शिंदे म्हणाले, राज्यात तलावांचे पुनरुज्जीवन केले जाईल. जलयुक्त शिवार, शहर सौंदर्यीकरण प्रकल्प सुरू आहेत. नवी मुंबईत नॅनो प्रकल्प उभारला जात आहे. शिवाय ‘समृद्धी’च्या आसपासच्या परिसरातही औद्योगिक केंद्रे उभारले जात आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. यासाठी 28 हजार कोटी निधीचे उद्दिष्ट आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यात केंद्राकडे 18 हजार कोटींचा प्रस्ताव दिला. हा सर्व निधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

    मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुरू असलेल्या याचिकांचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही. या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण येणार नाही.” विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीकेवर ते म्हणाले, ‘आम्ही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगावी अशी कदाचित विरोधी पक्षनेत्यांची मागणी असावी.’

    जीएसटी परतावा वेळेवर मिळेल

    थकीत जीएसटी परताव्यावरून महाविकास आघाडी सरकार व केंद्र सरकारमध्ये खटके उडायचे. केंद्राकडून वेळेत परतावा मिळत नसल्याने मविआच्या नेत्यांकडून केंद्रावर वारंवार टीका केली जात होती. आता केंद्राकडून जीएसटी परतावा वेळेवर मिळेल का? यावर शिंदे म्हणाले, ‘आता थकीत जीएसटी परतावा वेळेवर मिळेल. राज्यात सर्वासामान्यांच्या हिताचे सरकार आले आहे.’

    State’s proposal of 18 thousand crores to the Center Chief Minister Shinde is confident of getting full funds for development works

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस