विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे रेल्वे विभागातील पुणे ते दौंड रेल्वेमार्गावर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या मार्गावर ताशी १३० किलोमीटर वेगाने गाडय़ा धावू शकतील.State-of-the-art signal system on Pune-Daund railway line, trains running at 130 kmph
या टप्प्यातील रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होऊ शकणार आहे. इतर तांत्रिक कामेही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत असून, ती पूर्ण होताच हा मार्ग अधिक वेगवान होणार आहे.
- मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला; दीड वर्षांपासून बंद आहे सेवा
देशाच्या विविध भागांतून पुण्यापर्यंत येणाऱ्या आणि पुणे मार्गाने पुढे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ांसाठी पुणे-दौंड मार्ग अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या टप्प्यात सध्या पुणे-दौंड डेमू लोकलला परवानगी देण्यात आलेली नाही.
पुणे-दौंड रेल्वे मार्गाच्या टप्प्यामध्ये पुणे रेल्वेच्या संकेत आणि दूरसंचार विभागाच्या वतीने अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा (डबल डिस्टेंट सिग्निलग) बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या टप्प्यात १७ नवे सिग्नल बसविण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे ३६ सिग्नलमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रेल्वे चालकाला पूर्वसूचना मिळू शकते. त्याच्या आधारावर चालक गाडीचा वेग वाढवू शकतो.
State-of-the-art signal system on Pune-Daund railway line, trains running at 130 kmph