state cabinet important decision : कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. state cabinet important decision to help to artists and organizations in the pandemic situation
वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता, तसेच लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाटयगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने, व प्रयोगात्मक कला क्षेत्रातील संघटित व असंघटित विविध कला प्रकारातील कलाकार, ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबणा झाल्याची बाब लक्षात घेता, त्यांना आर्थिक साह्य देण्याची मागणी शासनाच्या विचाराधीन होती. सदर मागणी विचारात घेऊन राज्यातील अशा प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या 56,000 एकल कलावंतांना रुपये 5 हजार प्रति कलाकार प्रमाणे रुपये 28 कोटी व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील 847 संस्थांना रुपये 6 कोटी असे एकूण रुपये 34 कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच स्थानिक लोककलावंतांची निवड प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रशासकीय खर्च रुपये 1 कोटी यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
या कलावंतांची निवड वृत्तपत्र व इतर माध्यमातून जाहिरातीद्वारे अर्ज मागवून विहित पद्धतीने करण्यात येईल. एकल कलावंत निवडीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समिती कलावंतांची निवड करेल. संस्थांची निवड सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या स्तरावरील समितीव्दारे करण्यात येईल. पात्र कलावंताच्या बॅंक खात्यात सदर रक्कम संचालक, सांस्कृतिक कार्य यांच्यामार्फत जमा करण्यात येणार आहे.
state cabinet important decision to help to artists and organizations in the pandemic situation
महत्त्वाच्या बातम्या
- तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा मृत्यू, 79 जण गंभीर भाजले; 14 जणांची प्रकृती चिंताजनक
- सर्वसामान्यांना घाऊक महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा! सप्टेंबरमध्ये दर पोहोचले 10.66 टक्क्यांवर
- The Focus India Explainer : केंद्राने BSFचे अधिकार क्षेत्र का वाढवले? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर…
- जगातली पहिल्या महामारी प्रूफ इमारतीची निर्मिती सुरू, तब्बल 500 मिलियन डॉलर खर्चून बांधली जातेय 55 मजली इमारत
- अखिलेश यादवांसह अनेक नेत्यांनी महानवमीला दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल