• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला ठाकरे - पवार सरकारने पुसली पाने; महामंडळाचे विलीनीकरण नाहीच!! ST Workers Strike: Thackeray-Pawar Govt

    ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला ठाकरे – पवार सरकारने पुसली पाने; महामंडळाचे विलीनीकरण नाहीच!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एसटी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पण ठाकरे – पवार सरकारने कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीला पाने पुसली आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. एसटी महामंडळाच्या विलीनीकरण याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले होते. यावरून एसटी विलीनीकरण शक्य नाही, असा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.ST Workers Strike: Thackeray-Pawar Govt

    विलीनीकरणाचा प्रश्न अखेर निकाली

    मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी बाबतचा अहवाल सादर करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या एसटी विलीनीकरणाचा मुद्दा अखेरीस राज्य सरकारने निकाली काढला आहे. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

    एसटी विलीनीकरणावर १ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करत ५ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. मुदतवाढ देताना ही शेवटची संधी असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले होते.

    नाशिक मध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

    एसटी विलीनीकरणावर अद्याप कोणाताही निर्णय झाला नसल्याने नाशिकमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शिवनाथ फापाडे असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून, फापाडे शहापूर आगारात कामाला होते. गेल्या आठ वर्षांपासून फापाडे एसटी महामंडळात एसटी चालक म्हणून कार्यरत होते.

    ST Workers Strike: Thackeray-Pawar Govt

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस