• Download App
    ST Workers Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू ; परिवहन मंत्री अनिल परबांचा इशारा! । ST Workers Strike : Mesma on communicative ST workers; Transport Minister Anil Parban's warning!

    ST Workers Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू ; परिवहन मंत्री अनिल परबांचा इशारा!

    • एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनवाढ संदर्भातल्या मागण्या मान्य केल्यानंतरही एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकारकडून निलंबनाची कारवाई सुरुच आहे. अशामध्ये आता या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावू असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे. ST Workers Strike: Mesma on communicative ST workers; Transport Minister Anil Parban’s warning!

    अनिल परब म्हणाले की, मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा का याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन ही कारवाई करु.



    सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत नाही. पण आम्हाला जनतेचा सुद्धा विचार करावा लागेल. कर्मचारी, अधिकारी आणि  यदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली. मेस्मा लावण्याबाबत सरकार लवकर निर्णय घेईल.

    आतापर्यंत जी कारवाई करण्यात आली आहे ती मागे घेता येणार नाही. या संपाला आता नेता नाही. पण जो कुणी कर्मचाऱ्यांना भडकावत आहे त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे अनिल परब यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, विलीनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेली समिती निर्णय घेईल. या समितीसमोर सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आपले म्हणणे मांडत आहेत. समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर होईल त्यानंतर ते निर्णय घेतील.

    ST Workers Strike : Mesma on communicative ST workers; Transport Minister Anil Parban’s warning!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी