• Download App
    संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा मोठा धक्का, बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार । ST Workers Strike Labor court slams ST workers By Refusal to adjourn the proceedings

    मोठी बातमी : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा मोठा धक्का, बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार

    ST Workers Strike : राज्यातील संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. कामगार न्यायालयाने बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढच झाली आहे. ST Workers Strike Labor court slams ST workers By Refusal to adjourn the proceedings


    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. कामगार न्यायालयाने बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढच झाली आहे.

    मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तेव्हापासून काही एसटी कर्मचारी कामावर गैरहजर राहिले. परिवहन खात्याने अनेक वेळा सूचना देऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी न ऐकल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत 10,000 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. संपात सहभागी अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसाही देण्यात आल्या.

    एसटी महामंडळाने एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या कारवाईविरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर आणि यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित 9 कर्मचाऱ्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.

    ST Workers Strike Labor court slams ST workers By Refusal to adjourn the proceedings

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा