• Download App
    एसटीचा प्रवास कॅशलेस; काढता येणार डिजिटल तिकीट; पण अनिल परबांना धक्का|ST Travel Cashless; Removable Digital Ticket; But Anil Parba was shocked

    एसटीचा प्रवास कॅशलेस; काढता येणार डिजिटल तिकीट; पण अनिल परबांना धक्का

    प्रतिनिधी

    मुंबई : एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करावी लागणार नाही. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करता येईल अशा 5000 ॲण्ड्राईड तिकीट मशिन्स (android ticket machine) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशिनमुळे प्रवाशांना रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.ST Travel Cashless; Removable Digital Ticket; But Anil Parba was shocked

    मात्र या सगळ्या प्रक्रियेत माझी परिवहन मंत्री ठाकरे पवार सरकारमधील परिवहन मंत्री एसटी महामंडळाने धक्का दिला आहे. कारण त्यांच्या काळात नेमलेल्या कंत्राटी महाव्यवस्थापकांचा राजीनामा महामंडळाने आधीच घेतला आहे. त्यानंतर आता त्यांनी ठरविलेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या ऐवजी अन्य कंपनीची अँड्रॉइड तिकीट मशीन खरेदी केली आहेत.



    मे. ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर इंडिया लि., मे. पाईनलॅब व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने एसटी महामंडळास 5000 नवीन ॲण्ड्राईड आधारीत डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशिन्स मिळाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील सभागृहात एका समारंभात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते या मशिन्सचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यस्थापक मनोजकुमार सिन्हा, सहायक महाव्यवस्थापक राजा कुंदन शरण व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच एसटी महामंडळाचे विविध विभागांचे महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

    रोखीने व्यवहार कमी होण्यास मदत होणार

    यावेळी चन्ने म्हणाले, सध्या डिजिटल काळ आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे, असे सांगतानाच डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे माननीय पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी युपीआय, क्युआर कोड, इत्यादी डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या ५ हजार ॲण्ड्राईड आधारीत मशिन्सचा समावेश केला आहे. या सुविधेमुळे एसटी प्रवासात रोखीने व्यवहार कमी होण्यास मदत होणार आहे. नवीन ॲण्ड्राईड मशिन्स पहिल्या टप्प्यामध्ये अकोला, लातूर, यवतमाळ आदी शहरांमध्ये वापरात येणार आहेत.

    ST Travel Cashless; Removable Digital Ticket; But Anil Parba was shocked

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस