• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून काढले बाहेर; सीएसएमटी स्थानकात कर्मचाऱ्यांचा आक्रोश!! । ST personnel evacuated from Azad Maidan at midnight; Cry of employees at CSMT station !!

    एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून काढले बाहेर; सीएसएमटी स्थानकात कर्मचाऱ्यांचा आक्रोश!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचा तिढा काही अद्याप सुटलेला नाही. आझाद मैदानात आंदोलन करणा-या एसटी कर्मचा-यांना शुक्रवारी मध्यरात्री अचानकपणे पोलीसांनी आझाद मैदानातून बाहेर काढले. आमच्यावर लाठीचार्ज केला, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. आता एसटी कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकात ठिय्या दिला आहे. ST personnel evacuated from Azad Maidan at midnight; Cry of employees at CSMT station !!

    सदावर्तेंना अटक

    आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांना शुक्रवारी अटक केली आहे.



    तोपर्यंत हलणार नाही

    सीएसएमटी स्थानकात शेकडोंच्या संख्येने सध्या एसटी कर्मचा-यांनी ठिय्या मांडला आहे. आमची काही माणसे शुक्रवारपासून गायब आहेत. ती सर्व जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचा-यांनी घेतली आहे.

    आमच्या जीवाला धोका

    शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली. यानंतर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी माझ्या पतीच्या आणि कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यावर मी गुन्हा दाखल केल्यामुळे शरद पवार हे दबाव तंत्र करत असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

    ST personnel evacuated from Azad Maidan at midnight; Cry of employees at CSMT station !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!