विशेष प्रतिनिधी, मुंबई
- आपल काम बोलतंय… अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांच ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन.
- खर म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत… आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाच.
- ज्या वेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता… मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर… स्वबळ म्हणजे फक्त निवडणूका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ..
- जेंव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेंव्हा देखील शिवसेनाप्रमुख पूढे गेले…. ते स्वबळ.
- हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व! सर्वप्रथम देशाभिमान मग प्रादेशिक अस्मिता. आपल्या हिंदुस्थानचा पाया हा संघराज्याचा भाषावार प्रांत रचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये. देशाचा पाया हा प्रादेशिक अस्मितेचा आहे. जर या अस्मितेवर घाला आला तर संघराज्याच्या पायावर घाला होतोय.
- आम्हीं एकमेकांना भेटल्यावर जय महाराष्ट्र बोलतो, पण ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’, देश आधी…
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा…
या सेनापती बापटांच्या काव्यपंक्ती! ही ताकद महाराष्ट्राची आहे का? जरुर आहे. - बंगाल ने आज स्वत्व काय हे दाखवुन दिलंय… वंदे मातरम हा क्रांतीचा महामंत्र दिला…. त्याच बंगालने प्रादेशिक अस्मिता जपण्याचा मंत्र दिला.
- माझ्या आजोबांनी दिलेला हा वारसा आहे… हिंदुत्वाबद्दल सांगत असताना अनेकांचा गैरसमज होतो की महा विकास आघाडी म्हणजे हिंदुत्व सोडलं… ते काही पेटन्ट नाही कोणाचे. हिंदुत्व आमच्या हृदयात आहे.
- 55 वर्षे आपण जे राजकारण पाहिल त्यात जे दिग्गज राजकारणी होते… आताच्या नेत्यांची उंची कळतेय. या कोरोना च्या काळातही जे राजकारण चालले आहे ते राजकारणाचे विकृतीकरण होते, किंबहुना विद्रुपीकरण आहे.
- सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवुन जर अर्थकारणाची घडी बसवण्याकडे लक्ष नाही दिले तर ते योग्य नाही…
- सत्तेसाठी लाचार होणार नाही, परंतु उगाचच कोणाची पालखी वाहणार नाही. आम्ही आमच्या पाऊलावर खंबीरपणे पुढे वाटचाल करू… शिवसेना ही एक संघटना नाही, तो एक विचार आहे… तो पूढे जात राहणार आहे. शतकानुशतके!