विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मदतनिधी कथित घोटाळा प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात किरीट आणि नील सोमय्या पितापुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र सोमय्या यांचा जामीन फेटाळण्यात आला. Somaiya’s pre-arrest bail rejected
सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नये, अशी मागणी मुंबई गुन्हे शाखेने केली. किरीट सोमय्यांना ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे, असे गुन्हे शाखेनं कोर्टात सांगितले. सोमय्या यांच्या बँक खात्याचे तपशील हवेत, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टामध्ये युक्तीवाद करताना म्हटले.
ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. कधीही अटकेची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली.
दरम्यान, सोमय्या यांना वाचवण्यासाठी भाजपकडून बनावट पुरावे तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा आरोप शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत यांनी केला.
Somaiya’s pre-arrest bail rejected
महत्त्वाच्या बातम्या
- RamNavmi JNU : जेएनयूमध्ये रामनवमीला मांसाहार वाद आणि पुण्यात नास्तिक परिषदेच्या आग्रहातून जिहादी मानसिकतेचेच भरणपोषण!!
- Sharad Pawar : “सिल्वर ओक”वर दगड – चप्पल फेक – एसटी कर्मचारी – राऊत – “मातोश्री” व्हाया राष्ट्रवादी…!!; हल्ल्याची वळणे आणि “वळसे”!!
- ST Mastermind?? : दगडफेक – चप्पल फेक सिल्वर ओकच्या रस्त्यात; राजकीय लाभाची फळे राष्ट्रवादीच्या पदरात!!
- ST – Telco – Pawar : एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून हाकलले; पवारांनी टेल्को संप पहाटे मोडल्याची आठवण!!