• Download App
    अनिल परबांच्या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांची मुंबई हायकोर्टात याचिका Somaiya's petition in Mumbai High Court for CBI probe into Anil Parba's scam

    अनिल परबांच्या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांची मुंबई हायकोर्टात याचिका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे – पवार सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी, तसेच इन्कम टॅक्स, ईडी, पर्यावरण मंत्रालय, रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना यांच्या चौकशीचे निर्देश द्यावे, यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई हायकोर्टात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. Somaiya’s petition in Mumbai High Court for CBI probe into Anil Parba’s scam

    – सोमय्यांचे आरोप

    अनिल परब यांनी सरकारी दस्तावेजाची छेडछाड करून, राज्य सरकारची फसवणूक करून दापोली येथील मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावरील जागेवर बिनशेती परवानगी मिळवली. त्याचप्रमाणे शेती जमीन आहे असे म्हणून येथे २५ कोटींचा उभा केलेला रिसॉर्ट ४ वर्षानंतर परब यांनी आपले मित्र सदानंद कदम यांना १ कोटी १० लाख रुपयांमध्ये विकला. या जागेवर कोस्टल रेगुलेशन झोन व ना विकास क्षेत्र लागू असताना अनिल परब यांनी जागेचे मूळ मालक विभास राजाराम साठे त्याच पद्धतीने तत्कालीन उपविभागीय अधिकारी देशपांडे, ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालयातील लोकांशी मिळवणूक करून खोट्या पद्धतीने येथे रिसॉर्ट बांधण्याची परवानगी मिळवली.

    दि. २ मे २०१७ रोजी विभास साठे यांच्याकडून अनिल परब यांनी १ कोटी १० लाख रुपयांत शेत जमीन विकत घेतली, ताबा घेतला परंतु त्याचा करार दि. १९ जून २०१९ ला शेतजमीन म्हणून केले. परंतु, अवघ्या काही दिवसांत येथे १६,८०० स्के.फि चा रिसॉर्ट आहे व तो विभास साठे यांनी बांधला होता, तो रिसॉर्ट अनिल परब यांच्या नावाने करावा असा अर्ज अनिल परब यांनी दिला, तो ग्रामपंचायतने स्वीकारला व रिसॉर्ट अनिल परब यांच्या नावाने ग्रामपंचायतने ट्रान्सफर केला. २०१९-२०२०, २०२०-२०२१, २०२१-२०२२ या वर्षांची घरपट्टी, दिवाबत्ती कर, मालमत्ता कर हे सर्व अनिल परब व त्यांच्या सहयोगींनी भरले.


    ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी ईडीचे छापे; बजरंग खरमाटेही छाप्यांच्या जाळ्यात


    रिसॉर्टसाठी लागणारा पैसा कुठून आला?

    हा रिसॉर्ट बांधण्यासाठी लागणारा कोट्यावधी रुपये हे अनिल परब यांच्या आयकर रिटर्न मध्ये किंवा चोपड्या/वाहिखात्या मध्ये दाखवलेला नाही. अनिल परब या रिसॉर्टचे मालक असून दरवर्षी घरपट्टी, मालमत्ता कर भरतात परंतु, मालमत्तेचे मूल्य आपल्या चोपड्यात शून्य रुपये दिसत आहेत. किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा बाहेर काढल्यानंतर अनिल परब यांनी तडकाफडकी हा रिसॉर्ट आपले मित्र सदानंद कदम यांना शेतजमीन म्हणून केवळ १ कोटी १० लाख रुपयांत विकले. तो रिसॉर्ट मार्च २०२१ मध्ये सदानंद कदम यांच्या नावाने ट्रान्सफर झाला. एकंदर २५ कोटींचा रिसॉर्ट हा १ कोटी १० लाख रुपयांत शेतजमीन म्हणून विकावं हा एक मोठा घोटाळा आहे. हा रिसॉर्ट बांधण्यासाठी लागणारा पैसा कुठून आला, कुठल्या घोटाळ्याचा आहे यासाठी आयकर विभाग व प्रवर्तन निदेशालयाने चौकशी करायला हवी अशी मागणी याचिकाकर्ता किरीट सोमय्या यांची आहे. रिसॉर्ट बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या पैसा हा RTO ट्रान्सफर घोटाळ्याचा आहे की, पोलीस ट्रान्सफर घोटाळ्याचा आहे. बजरंग खरमाटे द्वारा आलेला आहे की, सचिन वाझे यांच्या कडून आला आहे याची ही चौकशी व्हावी.

    केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने तसेच महाराष्ट्रचे कोस्टल रेगुलेशन झोन अॅथोरीटीने हा रिसॉर्ट गैरकायदेशीर असून अनिल परब यांच्या विरोधात कारवाई व्हावी असे म्हंटले आहे. याचिकाकर्ता किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार केल्यानंतर ही रत्नागिरी पोलीसांनी याची दखल ही घेतली नाही. या घोटाळ्यात इन्कम टॅक्स, ईडी, महसूल विभाग, पर्यावरण मंत्रालये, रत्नागिरी जिल्हाधिकारी या सगळ्यांच्या चौकशीची आवश्यकता आहे. अनिल परब मंत्री असल्यामुळे महाराष्ट्र पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत असे ही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही केस सीबीआयकडे ट्रान्सफर करावी, असे किरीट सोमय्या यांनी अर्जात म्हटले आहे.

    Somaiya’s petition in Mumbai High Court for CBI probe into Anil Parba’s scam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!