प्रतिनिधी
मुंबई : कोकणातल्या दापोलीत किरीट सोमय्या हातोडा घेऊन राजकीय नाट्य घडवत आहेत, तर इकडे अनिल परब मुंबईत बसून किरीट सोमय्या यांना प्रतिआव्हान देत आहेत. Somaiya v / s Parab: Kirit Somaiya’s hammer play in Konkan
अनिल परब यांच्या दापोलीतल्या साई रिसॉर्टवर सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन तोडायला चालले आहेत. यावरून शिवसेना आणि भाजप तसेच मध्येच राष्ट्रवादी यांच्यात राजकीय नाट्य सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ते रत्नागिरीच्या दिशेने निघाल्यावर त्यांना कशेडी घाटात पोलिसांनी अडवले 149 कलमानुसार तुम्हाला तेथे जाता येणार नाही, असे पोलिसांनी सांगताच सोमय्यांनी त्यावर या नोटीसवर स्वाक्षरी करायला करायला नकार देऊन ते पुढे निघून गेले. दापोलीत त्यांना भाजपचे आमदार नितेश राणे जॉईन झाले.
या दरम्यान भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून घेतले आहे. सध्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दापोलीतल्या रस्त्यावर जमले आहेत.
तिकडे दापोलीतील सोमय्या हातोडा राजकीय नाट्य घडवत असताना इकडे अनिल परब यांनी सोमय्या यांना आव्हान दिले आहे. जो रिसॉर्ट सोडायला सोमय्या चालले आहेत तो रिसॉर्ट आपला नाहीच, असा दावा अनिल परब यांनी केला आहे. तो रिसोर्ट तोडायचा असेल तर तो न्यायालयाच्या आदेशाने तोडला पाहिजे. सोमय्या हे काय न्यायालय आहेत का? की पालिकेचे अधिकारी आहेत असा सवाल त्यांनी केला आहे. केवळ आपली बदनामी करण्यासाठी कॅरेट सोमय्या हातोडा नाट्य घडवत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला ते लवकरच या रिसॉर्ट संदर्भात हायकोर्टात जाणार आहेत.
किरीट सोमय्या दापोलीच्या जवळ पोहचले असून त्यांच्यासोबत भाजप नेते निलेश राणेही आहेत. पण किरीट सोमय्यांना अडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दापोली चौकात ठिय्या मांडून बसले आहेत. हातात काळे झेंडे घेऊन राष्ट्रवादी व शिवसेनेची कार्यकर्ते तेथे असून दुसरीकडे सोमय्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्तेही तेथे उपस्थित आहेत.
तत्पुर्वी कशेडी घाटात सोमय्यांचा ताफा पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांकडून सोमय्यांना नोटीस देण्यात आली पण सही न करता ती त्यांनी स्विकारली होती. आता किरीट सोमय्या कशेडी घाटातून खेडमार्गे ते दापोलीच्या दिशेने दापोलीत पोहचत आहेत. साथीला भाजप नेते निलेश राणेही आले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कायदा हातात घेतला तर पोलिस कारवाई करतील असा इशारा दिला आहे.
किरीट सोमय्यांना गृहमंत्र्यांचा इशारा
सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिस नियमाप्रमाणे कारवाई करतील. सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचा घाट आहे. कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे असे म्हणायचे व नंतर मोठे मोर्चे काढून कायदा व सुव्यवस्था बिघडवायची प्रयत्न आहे. सोमय्यांना जास्त महत्व देण्याचे कारण नाही. खोट्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही.
दापोली जात आहे, थांबणार नाही – सोमय्या
माफिया सरकारच्या रत्नागिरी पोलिसांनी मला रत्नागिरी जिल्हा प्रवेशावर खेड सिमेवर नोटीस दिली. सीआरझेडमधील अनिल परबांचा बेकायदेशीर रिसॉर्ट तुटल्यावर बेरोजगारी होणार आहे. असे पोलिसांनी म्हटलें आहे. माझ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून मी दापोली जावू नये असे पोलिसांनी म्हटले आहे. पण मी दापोली जात आहे, थांबणार नाही असे मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे
ज्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप हा संघर्ष सुरू आहे. भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या घरून 40 ते 50 गाड्याभरून कार्यकर्ते दापोलीकडे रवाना झाले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत.
यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला आहे. दरम्यान सोमय्यांनी एक मोठा हातोडा मिडीयाला दाखवत हे जनतेच्या भावनेचे प्रतिक आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावेळी बोलताना अनाधिकृत बांधकाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडावे, नाहीतर बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
मिडीयाला चित्रीकरणास बंदी
सोमय्या आज संध्याकाळी साई रिसॉर्टवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक त्यांना दापोलीतच अडवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाद वाढू नये म्हणून दापोली पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त लावला आहे. दरम्यान या वेळेत साई रिसॉर्ट परिसरात मीडियाला चित्रीकरण करण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.
Somaiya v / s Parab: Kirit Somaiya’s hammer play in Konkan
महत्त्वाच्या बातम्या
- भांडणे साेडविण्यासाठी गेलेल्या पाेलीसाच्या हातावरच कोयत्याने वार
- ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सव्वाकाेटींचा ऐवज लंपास
- राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 1 एप्रिलपासून नवे दर
- द्रुतगती महामार्गावर रसायनाचा टँकर पलटी झाल्याने सात तास वाहतूक विस्कळीत
- कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची मोठी घोषणा, म्हणाले – 2023 मध्ये माझी अखेरची निवडणूक, पण राजकारणात राहणार