Somaiya slammed the NCP : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांना कोल्हापूर दौर्यात अडथळा आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती. परंतु आता त्यातून धडा घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना फारसा विरोध करायचा नाही, असे ठरवले आहे. उद्या किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे काळे झेंडे लावून “स्वागत” करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा डिवचले आहे. हिंमत असेल तर माझा कोल्हापूर दौरा रोखून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले आहे. Somaiya slammed the NCP for welcoming by black flags; Says If you have the courage, stop the Kolhapur tour
प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांना कोल्हापूर दौर्यात अडथळा आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती. परंतु आता त्यातून धडा घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना फारसा विरोध करायचा नाही, असे ठरवले आहे. उद्या किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे काळे झेंडे लावून “स्वागत” करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा डिवचले आहे. हिंमत असेल तर माझा कोल्हापूर दौरा रोखून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले आहे.
उद्यापासून सोमय्या हे मुंबई प्रभादेवी येथून कोल्हापूर दौऱ्याला प्रारंभ करतील. या दौऱ्यात कोल्हापूरमधील मुरगुड, कागल, इथे भेट देण्याचा सोमय्यांचा मानस आहे. कोल्हापूर पोलिस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसऱ्या घोटाळ्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत .
त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सामनातून देखील सोमय्यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. मात्र किरीट सोमय्या यांनीही जोरदार टीका केली असून, ‘हिंमत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असे आव्हान त्यांनी दिले आहे. जर किरीट सोमय्याची हास्यजत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, तर मग ‘सामना’मधून किरीट सोमय्याची दखल का घेता?, असा थेट सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्यांची कोल्हापूर दौऱ्यात अडवणूक करणे गैर आहे, असे खुद्द शरद पवार स्वत: बोलतात. सरकारला सांगावे लागते की दौरा अडवला याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला नव्हती, हे अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांचा दौरा सरकारला का अडवावा लागतो. हे सगळे सरकार का करतेय?, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला. उद्यापासून मुंबई प्रभादेवी येथून सोमय्या आपल्या कोल्हापूर दौऱ्याला प्रारंभ करतील. या दौऱ्यात कोल्हापूरमधील मुरगुड, कागल, इथे भेट देण्याचा सोमय्यांचा मानस आहे. कोल्हापूर पोलिस स्टेशनला हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसऱ्या घोटाळ्याविरोधात सोमय्या तक्रार दाखल करणार आहे. यावेळी सोमय्यांबरोबर भाजप नेत्यांची फौज असणार आहे. कोल्हापूर दौऱ्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अशिष शेलार आणि खासदार गोपाळ शेट्टी हे सोमय्यांबरोबर असतील.
– मुश्रीफ यांच्यावर काय आहेत आरोप?
हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी १२७ कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला होता. तसेच मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याचे सोमय्या म्हणाले होते. मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडियाचे बेनामी मालक आहेत. या कंपनीत ७,१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे. आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार, असे सोमय्या म्हणाले होते.
Somaiya slammed the NCP for welcoming by black flags; Says If you have the courage, stop the Kolhapur tour
महत्त्वाच्या बातम्या
- Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच मुख्यमंत्री बोम्मई
- कोरोना कालावधीतील सरकारी खर्चावरील निर्बंध उठले, अर्थ मंत्रालयाच्या सूचना, विभाग आता बजेटच्या अंदाजानुसार खर्च करू शकतील
- ‘कोणीही टाळी वाजवली नाही’, चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या यूएनजीएच्या भाषणावर टोमणा, सिब्बल यांचीही टिप्पणी
- अमेरिकेच्या ‘ऐतिहासिक’ भेटीनंतर पीएम मोदींचे भारतात आगमन; जाणून घ्या, किती महत्त्वाचा होता हा दौरा!