• Download App
    साखर कारखान्यांच्या प्राप्तीकराचा ३५ वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न सोडवला, देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार|Solved the lingering issue of income tax of sugar factories which has been lingering for 35 years, Devendra Fadnavis thanks PM Modi and Amit Shah

    साखर कारखान्यांच्या प्राप्तीकराचा ३५ वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न सोडवला, देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांना किमान हमी भावापेक्षा जास्त भाव दिल्यावर लागू करण्यात आलेला प्राप्तीकर बंद केला आहे. प्राप्तिकर नोटिसांचा ३५ वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न त्वरेने निर्णय घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.Solved the lingering issue of income tax of sugar factories which has been lingering for 35 years, Devendra Fadnavis thanks PM Modi and Amit Shah

    फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला शब्द पाळला. मागील ३५ वर्षांपासून साखर उद्योगावर जे आयकर विभागाचं संकट होतं ते दूर करत आज (७ जानेवारी २०२२) त्याबाबतचं नोटीफिकेशन जारी केलं.



    यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि मी स्वत: अमित शाह यांना भेटलो होतो. आम्ही अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत गेल्या ३५ वर्षे शेतकऱ्याला ज्याने जास्त पैसे दिले अशा साखर कारखान्यांवर आयकर विभागाची टांगती तलवार लटकलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं.

    शेतकऱ्याला अधिकचे पैसे दिले म्हणून अशा साखर कारखान्यांकडून ९,००० कोटी रुपयांची वसूली करण्यात येत आहे. हा एक प्रकारचा अन्याय आहे. या भेटीत अमित शाह यांनी सरकार यावर निर्णय करेल असं सांगितलं होतं.

    त्यांनी अतिशय तडकाफडकी हा निर्णय घेतला. यामुळे साखर कारखानदारीला मोठा फायदा होणार आहे. वषार्नुवर्षाच्या या मागण्या रद्द होतील आणि शेतकºयांना अधिकचा पैसा देण्यासाठी साखर कारखान्यांना अधिकचा फायदा मिळणार आहे.

    Solved the lingering issue of income tax of sugar factories which has been lingering for 35 years, Devendra Fadnavis thanks PM Modi and Amit Shah

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    गटशेतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनाला गती; ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणायचा संकल्प; फार्मर कपचा शुभारंभ!!

    Vishwas Nangare Patil : माझी कटिबद्धता संविधानाशी, ‘कंडक्ट रुल्स’चा कोणताही भंग केलेला नाही; RSSच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती