विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांना किमान हमी भावापेक्षा जास्त भाव दिल्यावर लागू करण्यात आलेला प्राप्तीकर बंद केला आहे. प्राप्तिकर नोटिसांचा ३५ वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न त्वरेने निर्णय घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.Solved the lingering issue of income tax of sugar factories which has been lingering for 35 years, Devendra Fadnavis thanks PM Modi and Amit Shah
फडणवीस म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला शब्द पाळला. मागील ३५ वर्षांपासून साखर उद्योगावर जे आयकर विभागाचं संकट होतं ते दूर करत आज (७ जानेवारी २०२२) त्याबाबतचं नोटीफिकेशन जारी केलं.
यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि मी स्वत: अमित शाह यांना भेटलो होतो. आम्ही अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत गेल्या ३५ वर्षे शेतकऱ्याला ज्याने जास्त पैसे दिले अशा साखर कारखान्यांवर आयकर विभागाची टांगती तलवार लटकलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं.
शेतकऱ्याला अधिकचे पैसे दिले म्हणून अशा साखर कारखान्यांकडून ९,००० कोटी रुपयांची वसूली करण्यात येत आहे. हा एक प्रकारचा अन्याय आहे. या भेटीत अमित शाह यांनी सरकार यावर निर्णय करेल असं सांगितलं होतं.
त्यांनी अतिशय तडकाफडकी हा निर्णय घेतला. यामुळे साखर कारखानदारीला मोठा फायदा होणार आहे. वषार्नुवर्षाच्या या मागण्या रद्द होतील आणि शेतकºयांना अधिकचा पैसा देण्यासाठी साखर कारखान्यांना अधिकचा फायदा मिळणार आहे.
Solved the lingering issue of income tax of sugar factories which has been lingering for 35 years, Devendra Fadnavis thanks PM Modi and Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांचा दौरा, सुरक्षिततेतील हलगर्जीपणा आणि सतलजच्या पात्रातील पाकिस्तानी होडीचे रहस्य
- पंतप्रधानांना मृत्यूच्या विहिरीत ढकलण्याचा योगायोगा नव्हता, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने केली असती हत्या, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा संशय
- जगभरात अवघ्या २४ तासांत २५ लाख जणांना कोरोनाची लागण
- पाच राज्यांत निवडणुका घेण्यासाठी एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे ८० टक्के लसीकरण, प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला
- अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन पुन्हा बरसले