• Download App
    WATCH : इंजिनिअर तरुणाकडून फेसबुकवर अश्लील व्हिडिओ, सोलापूर पोलिसांची कारवाई । Solapur police arrested an engineering student for Pornographic video on Facebook

    WATCH : इंजिनिअर तरुणाकडून फेसबुकवर अश्लील व्हिडिओ, सोलापूर पोलिसांनी अशी केली अटक

    सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्याला तरुणाला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. मनीष विजयराज बंकापूर असे अटक केलेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो सध्या इलेकट्रोनिक्स अभियांत्रिकीच शिक्षण घेत असून सोलापूर पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणाचा शोध घेऊन त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. दरम्यान, सोशल मीडियावर, इंटरनेटवर अश्‍लील चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करणे, पाहणे, शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संबंधिताला पहिल्या दोषसिद्धीस पाच वर्षांची कैद व दहा लाखांच्या दंडाची शिक्षा आहे. तर दुसऱ्यांदा दोषारोप सिद्ध झाल्यास त्याला सात वर्षांची कैद आणि दहा लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. अशा बाबींवर सायबर क्राइमचा वॉच असून संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. सोलापुरातील तरुणावर अशीच कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून सोलापूर पोलिसांकडे ही केस पाठविण्यात आली होती. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने त्या तरुणाची खात्री केली. त्याच्या मोबाईलचा ‘आयपी’ ऍड्रेसचा शोध घेऊन त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली.  Solapur police arrested an engineering student for Pornographic video on Facebook

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती