• Download App
    सोलापूरातून किरीट सोमय्यांचे आता थेट पवार कुटुंबीयांना आव्हान; पवार काय प्रत्युत्तर देणार? । Solapur News Kirit Somaiya challenges Pawar family; What will Pawar reply

    सोलापूरातून किरीट सोमय्यांचे आता थेट पवार कुटुंबीयांना आव्हान; पवार काय प्रत्युत्तर देणार?

    Kirit Somaiya challenges Pawar : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचे सत्र चालवले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी वारंवार अनेक नेत्यांवर आरोप केले असतानाच, आता त्यांनी थेट पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. Solapur News Kirit Somaiya challenges Pawar family; What will Pawar reply


    प्रतिनिधी

    सोलापूर : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचे सत्र चालवले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी वारंवार अनेक नेत्यांवर आरोप केले असतानाच, आता त्यांनी थेट पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे.

    आपल्या यादीत बारा नेत्यांची नावं होती आणि त्यात आता काही राखीव नेत्यांची नावे आपण वाढवली असून, त्याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार रविवारी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले आव्हान दिले आहे. अजित पवारांच्या बहिणी या जरंडेश्वर कारखान्यात भागीदार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच यासंबंधीचे पुरावे मी ईडीला सोपावणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

    आत्तापर्यंत किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधत होते वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये जाऊन घोटाळे बाहेर काढले असे दावे करत होते. परंतु_ आता किरीट सोमय्या यांनी थेट पवार घराण्यालाच आव्हान दिले असल्याने, पवार परिवार सोमय्या यांच्या आरोपांवर नेमके काय उत्तर देणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर तसेच नवाब मलिक यांच्या जावयावरही आरोप केले होते.

    Solapur News Kirit Somaiya challenges Pawar family; What will Pawar reply

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!