विशाल फटे याने सोमवारी सकाळी स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली.Solapur: Barshi court sentences Vishal Fateh to 10 days police custody
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ‘फटे स्कॅम’ची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरु होती.दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी फटे सोमवारी स्वत:हून पोलिसांत हजर झाल्यानंतर त्याला आज बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले.यानंतर न्यायालयाने फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विशाल फटे हा काही दिवस फरार देखील होता.विशाल फटे याने सोमवारी सकाळी स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली.त्यानंतर तो रात्री पोलिसांत हजर देखील झाला. दरम्यान आज (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान यावेळी विशाल फटेच्या वकिलांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. परंतु सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी याला विरोध करत पोलिसांची बाजू मांडली. दरम्यान यानंतर न्यायालयाने फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Solapur : Barshi court sentences Vishal Fateh to 10 days police custody
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : राणीच्या बागेत नुकतच झालय एका नवीन पाहुण्याचं आगमन , वाघिणीच्या बछड्याच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण
- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : हवाई दलाच्या ७५ विमानांची अनोखी मानवंदना राजपथ अनुभवणार!!
- शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात काँग्रेस कमजोर करताहेत; काँग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र!!
- ओमायक्रॉनपुढे लसीचा चौथा डोस देखील निष्प्रभ? इस्रायलमध्ये कोरोना लसीची परिणामकारकता कमी