मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं…. So let’s take out Narayan Rane’s horoscope, Vinayak Raut’s warning
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी मंत्री नारायण राणे यांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे.
प्रहारमध्ये काय छापून येणार ते बघू. पण ते स्वतः चिखलात बुडालेले आहेत, असं सांगतानाच आम्हीही राणेंचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू, असा सूचक इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
फडणवीस शहा यांची भेट ही पक्षांतर्गत चर्चेसाठी असेल. पक्षांतर्गत गाठीभेटीवर मला काही बोलायचं नाही. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असं त्यांनी सांगितलं.
… So let’s take out Narayan Rane’s horoscope, Vinayak Raut’s warning
महत्त्वाच्या बातम्या
- कॅप्टन साहेबांनी धर्मनिरपेक्ष अमरिंदरसिंगांना “मारले”;काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक बरसले
- दिल्ली सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ५०००० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली
- उत्तर प्रदेशात अखिलेश यादव – ओमप्रकाश राजभर एकत्र; मग असदुद्दीन ओवैसी वाऱ्यावर का??
- भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नकारात्मक RT-PCR अहवाल आवश्यक, मार्गदर्शक तत्त्वे जारी