• Download App
    कोळसा घोटाळ्यात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जण दोषी; 18 जुलैला सुनावणार सजा Six people including former Congress MP Vijay Darda, Devendra Darda are guilty in the coal scam

    कोळसा घोटाळ्यात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जण दोषी; 18 जुलैला सुनावणार सजा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : छत्तीसगढ कोळसा खाण वाटप प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टाने हा निकाल दिला आहे. १८ जूलैला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. फौजदारी कायदा कलम 120B, 420 खाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहेत. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी विजय दर्डा आणि एका कंपनीसह सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. Six people including former Congress MP Vijay Darda, Devendra Darda are guilty in the coal scam

    काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह इतरांवरील आरोप निश्चित करताना न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी १८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने IPC च्या कलम 120B 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरविले.

    कोर्टाने दोषी ठरवलेल्यांमध्ये माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांचा समावेश आहे.

    Six people including former Congress MP Vijay Darda, Devendra Darda are guilty in the coal scam

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक