वृत्तसंस्था
कल्याण : दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना ग्रस्त असल्याचे स्पष्ट होताच कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासातून आलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे.नायजेरियामधून आलेले सहा प्रवासी सापडले असून त्यांचे आरटी पीसीआर सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. Six migrants from Nigeria in Kalyan – Dombivli; Examination of RT-PCR samples started
पॉझिटिव्ह रुग्णाबरोबर विमानातून प्रवास केलेल्या ४२ जणांची यादी आरोग्य विभागाने शासनाकडे पाठवली असून या सर् जणांची rt-pcr टेस्ट त्या-त्या महापालिकांकडून केली जात आहे.या करोनाग्रस्त प्रवाशाचा सह प्रवासी असलेलया ५० वर्षीय गृहस्थाची आज चाचणी केली जाणार आहे तर दुसरीकडे रुग्ण सापडलेल्या इमारती मधील सर्व नागरिकांचे थुंकीचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाबाबत आरोग्य विभागाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नसल्याचे पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
- कल्याण – डोंबिवलीमध्ये नायजेरियाचे सहा प्रवासी
- महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क
- आरटी- पीसीआर चाचणीसाठी नमुने संकलित
- पॉझिटिव्ह रुग्णाबरोबर ४२ जणांची यादी
- जीनोम सिक्वेन्सिंग अहवालावर चर्चा
Six migrants from Nigeria in Kalyan – Dombivli; Examination of RT-PCR samples started
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड
- म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन
- अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल