• Download App
    लतादीदींना न्युमोनिया, आणखी 10 -12 दिवस ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्येच उपचार । Singer Lata Mangeshkar continues to be in the ICU ward. She will be under observation for 10-12 days

    लतादीदींना न्युमोनिया, आणखी 10 -12 दिवस ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्येच उपचार

    वृत्तसंस्था

    मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोना संसर्गा बरोबरच न्युमोनियाही झाला आहे. त्या सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. Singer Lata Mangeshkar continues to be in the ICU ward. She will be under observation for 10-12 days

    लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग याबरोबरच न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यावर दोन्ही विकारांसंदर्भात उपचार सुरू आहेत. त्यांचे 92 हे वय लक्षात घेता त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्या उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.

    लतादीदींना आणखी 10 – 12 दिवस उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागेल. त्यानंतरच पूर्ण तपासणी करून घरी सोडण्यात येईल, असे डॉ. समदानी म्हणाले.

    Singer Lata Mangeshkar continues to be in the ICU ward. She will be under observation for 10-12 days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती