सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले.Sindhutai’s body was buried according to Mahanubhav sect
विशेष प्रतिनिधी
पुणे : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी (ता.४) रात्री ८ वाजून १० मिनीटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधूताईंची मुलगी ममता सपकाळ यांच्यासह त्यांच्या नेहमी सोबत असणाऱ्या नातलगांनी रुग्णालयाच्या बाहेर हंबरडा फोडला.
सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.दरम्यान पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. तसेच सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
Sindhutai’s body was buried according to Mahanubhav sect
- सर्वांना “बाळा” म्हणणार्या सिंधुताईंना माझं नाव मात्र तोंडपाठ होत ; तेजस्विनी पंडित गहिवरल्या
- SINDHUTAI SAPKAL: महाराष्ट्र आज एका मातेला मुकला : देवेंद्र फडणवीस
- माई गेल्या असं कुणीही म्हणू नका , मुलगी ममता सपकाळ यांचं आवाहन
- BREAKING NEWS : भावपूर्ण श्रद्धांजली ! अनाथांची माय गेली ; सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन