प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ची बहिण हसीना पारकर आमच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी भाजप नाही विधिमंडळ परिसरात स्वाक्षर्यांची मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील स्वाक्षरी करून टाकली.Signature of Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal on the campaign to remove Nawab Malik
भाजपचे आमदार महेश चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांना विधिमंडळ परिसरात पाहताच त्यांच्या हातात पेन दिले आणि त्यांना नवाब मलिक हटाव फलकावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यांनी ताबडतोब स्वाक्षरी केली आणि ते विधिमंडळाच्या पायऱ्या चढून आत मध्ये निघून गेले. आपण कशावर स्वाक्षरी केली त्यांच्या कदाचित लक्षातही आले नाही.
पण याची जेव्हा बातमी झाली, तेव्हा मात्र राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या बचावाला आले. नरहरी झिरवाळ हे साधे आदिवासी नेते आहेत. त्यांना उगाच कोणत्या राजकीय मुद्द्यावरून घेण्याचा प्रयत्न करू नका, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
– राष्ट्रवादीचे तीन टर्म आमदार
परंतु नरहरी झिरवाळ हे तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदारसंघातून ते निवडून येत आहेत. सध्या ते विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद संभाळत आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पदही मिळाले आहे आणि त्यांनी नवाब मलिक हटाव मोहिमेवर स्वाक्षरी केल्यामुळे ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी जरी त्यांचा बचाव केला असला तरी खुद्द नरहरी झिरवाळ यांच्याकडून मात्र याबाबत कोणताही खुलासा आलेला नाही.
Signature of Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal on the campaign to remove Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- OBC reservation : ओबीसी आरक्षण टाळण्यात राजकीय फायदा कोणाचा…?? आणि नुकसान कोणाचे…??
- रशियन फौजांच्या आक्रमणामुळे लाखांहून अधिक नागरिक जीव वाचविण्यासाठी युक्रेनमधून परागंदा
- रशियाची युक्रेनच्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक सुरु असल्याने युरोपमध्ये खळबळ
- बिबट्या घरात घुसून बसल्याने घबराट
- भागलपूर येथे शक्तिशाली स्फोटात सात जण ठार