प्रतिनिधी
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या राष्ट्रवादी संवाद मेळाव्यात ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली. कन्यादान संदर्भातले मंत्र म्हणताना त्यांनी पुरोहित वर्गाला, ब्राह्मण समाजाला डिवचले. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे विकट हास्य करण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.
Siege of Supriya Sule; But he did not listen to Mitkari’s speech
मात्र, या मुद्द्यावरून ब्राह्मण समाज संतप्त झाला आणि ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलने केली. पुणे, नाशिक, पंढरपूर मध्ये ब्राह्मण समाज रस्त्यावर आला. मिटकर यांच्या भाषणाचा विषय राष्ट्रवादीच्या अंगलट येत आहे हे पाहून जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी मिटकर यांच्या वक्तव्याला पासून आपले हात झटकून टाकले आहेत.
पंढरपुरात ब्राह्मण समाज बांधवांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घालून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपण अमोल मिटकरी यांचे भाषण ऐकलेच नाही. पण त्यांनी काही वक्तव्य केले असेल तर वाईट वाटून घेऊ नका, असे सांगत या घेरावातून काढता पाय घेतला.
अमोल मिटकरी मात्र स्वतःच्या वक्तव्यावर ठाम असून त्यांनी माफी मागण्यास नकार देऊन आपल्यावरची बाजी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्यावर उलटवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे गैरउद्गार काढले होते त्याबद्दल त्यांना माफी मागायला सांगा, असे अमोल मिटकरी हे ब्राह्मण समाजाला उद्देशून म्हणाले आहेत. मात्र, मिटकरी यांच्या वक्तव्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही असे सांगत जयंत पाटील धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी हात झटकून टाकले आहेत.
Siege of Supriya Sule; But he did not listen to Mitkari’s speech
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माला अटक मुंबई क्राईम ब्रँचमध्ये खंडणी मागितल्याची तक्रार
- Jahangirpuri bulldozer : जहांगीरपुरीतले “राजकीय पर्यटन”, पण दगडफेक आणि हिंसाचारानंतर नव्हे, तर बुलडोजर कारवाईनंतर!!
- Thackeray – Sule : महाराष्ट्रात शिवीगाळीनंतर गाजू लागलेय सोय – सुपारी – चांदीचे ताट…!!
- अमाेल मिटकरींच्या वक्तव्यावरुन पुण्यात वाद; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमाेर ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते भिडले