• Download App
    औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना, मोबाईलमध्ये बाय बाय स्टेटस ठेवत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या । Shocking incident in Aurangabad, student commits suicide by hanging while keeping bye bye status in mobile

    औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना, मोबाईलमध्ये बाय बाय स्टेटस ठेवत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    तो अठरा वर्षांचा होता. या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.Shocking incident in Aurangabad, student commits suicide by hanging while keeping bye bye status in mobile


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील ताजनापुर गावात धक्कादायक घटना घडली आहे.मोबाईलवर बाय बायचे स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.मयत युवकाचे नाव राजेश ज्ञानेश्वर काळे असे आहे.तो अठरा वर्षांचा होता.या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.



    घटना कशी घडली?

    घरातील सर्व व्यक्ती शेतात कामाला गेलेले पाहून राजेशने स्वतःच्या मोबाईल वर बाय बाय स्टेटस ठेवल.स्टेटस ठेवल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान राजेशच्या मिञांनी त्याचा हा स्टेटस बघुन राजेशचा शोध घेतला .यावेळी त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

    दरम्यान या घटनेची माहिती बाजारसावंगी पोलीस ठाण्यात देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने युवकाचा मृतदेह खाली उतरवला.त्यानंतर मृत्यूदेह शेवविच्छेदनासाठी बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. दरम्यान पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    Shocking incident in Aurangabad, student commits suicide by hanging while keeping bye bye status in mobile

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ