• Download App
    Shocking ! अकोल्यात महिलेला जात पंचायतीची थुंकी चाटण्याची शिक्षा ; गुन्हा दाखल ! Shocking! Caste panchayat asks woman to lick spit for second marriage in Maharashtra

    Shocking ! अकोल्यात महिलेला जात पंचायतीची थुंकी चाटण्याची शिक्षा ; गुन्हा दाखल

    • अनेक कायदे केले तरी जात पंचायतीने दिलेल्या विकृत शिक्षांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

    • घटस्फोटानंतर दुसरं लग्न केल्यामुळे जात पंचायतीने एका ३५ वर्षीय महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिली.

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : अकोला जिल्ह्यातील वडगाव इथल्या जात पंचायतीने महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याप्रकरणी दहा पंचांवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण तपासासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिसांकडे वर्ग केलं आहे.Shocking! Caste panchayat asks woman to lick spit for second marriage in Maharashtra

    ९ एप्रिल २०२१ रोजी जातपंचायतीमध्ये थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याचा आरोप पीडितेना केला आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केल्याच्या कारणावरुन जातपंचायतीने संबंधित महिलेला ही शिक्षा दिली. जात पंचायतीने या महिलेला तिच्या कृत्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड भरण्याची शिक्षाही दिली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

    मात्र, या महिलेले हिंमत करुन या दोन्ही शिक्षा नाकारल्या आणि या प्रकाराविरुद्घ पोलिसात तक्रार दाखल केल्याचं कळत आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडली आहे. मात्र या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. जळगावमध्ये राहणाऱ्या या महिलेच्या फिर्यादीवरुन जात पंचायतीच्या १० सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव या गावात ही धक्कादायक घटना घडली . पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर याच्याशी २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन २०१५ मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायत च्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान पीडित महिलेने २०१९ मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाह जात पंचायतीने अमान्य केला आणि पंचांनी तिला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

    महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारु, मटणावर ताव मारला आणि त्या परिवारास जातीतून बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत राहावे, असा हेका पंचांनी कायम ठेवला. तसेच पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे आणि त्या महिलेने ते चाटायचे अशी शिक्षा महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडवले.

    Shocking! Caste panchayat asks woman to lick spit for second marriage in Maharashtra

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस