Sunday, 11 May 2025
  • Download App
    Shivsena Vs Congress : शिवसेना मंत्री अनिल परबांकडून काँग्रेस आमदाराच्या कामात अडथळे, जिशान सिद्दिकींनी ट्वीटरवर व्यक्त केली वेदना । Shivsena Vs Congress Shivsena Minister Anil Parab obstructs Congress MLAs work, Zeeshan Siddiqui expresses pain on Twitter

    Shivsena Vs Congress : शिवसेना मंत्री अनिल परबांकडून काँग्रेस आमदाराच्या कामात अडथळे, जिशान सिद्दिकींनी ट्वीटरवर व्यक्त केली वेदना

    Shivsena Vs Congress Shivsena Minister Anil Parab obstructs Congress MLAs work, Zeeshan Siddiqui expresses pain on Twitter

    Shivsena Vs Congress : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब हे आपल्या कामात अडथळे आणत असल्याचा आरोप वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार जिशान सिद्दिकींनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतला पराभव मंत्री अनिल परब यांनी आतातरी मान्य करावा व आपल्याला विकास कामे करू द्यावीत, असं मत जिशान सिद्दिकींनी व्यक्त केलं आहे. याबाबत काही झालंच नाही, तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागेल, असा इशाराही जिशान सिद्दिकी यांनी दिला आहे. Shivsena Vs Congress Shivsena Minister Anil Parab obstructs Congress MLAs work, Zeeshan Siddiqui expresses pain on Twitter


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब हे आपल्या कामात अडथळे आणत असल्याचा आरोप वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार जिशान सिद्दिकींनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतला पराभव मंत्री अनिल परब यांनी आतातरी मान्य करावा व आपल्याला विकास कामे करू द्यावीत, असं मत जिशान सिद्दिकींनी व्यक्त केलं आहे. याबाबत काही झालंच नाही, तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागेल, असा इशाराही जिशान सिद्दिकी यांनी दिला आहे.

    ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार जिशान सिद्दिकी म्हणाले की, जनतेने मला कौल दिला. माझ्या मतदारसंघात कामे करताना जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न अनिल परब करत आहेत. हे त्यांना शोभणारे नाही. ते ज्येष्ठ मंत्री आहेत. माझ्या मतदारसंघाती छोटी-छोटी कामेही केवळ एनओसी न मिळाल्याने वर्षभर पडून आहेत, याबाबत सर्व काही मी माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर पत्राद्वारे घातलं आहे. आता मात्र हा विषय मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार आहे. माझ्या मतदारसंघात केवळ परबांमुळे काम होऊ शकत नसतील तर मला याविरोधात आवाज उठवावाच लागेल, अशी भावना काँग्रेस आमदार जिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केली आहे.

    आमदार जिशान सिद्दिकी यांनी ट्विटरवर अनिल परब यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मंत्री अनिल परब जाणीवपूर्वक असे करत आहेत. मागच्या दीड वर्षापासून मला हा त्रास सहन करावा लागतोय. मी माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोललोय. आता मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील बोलावं लागणार आहे. अनिल परब यांना असं वागणं शोभत नाही. तरुणांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे. ते वरिष्ठ आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि ते असं वागत असतील तर हे शोभणारे नाही. असे प्रकार वारंवार समोर येत आहे.

    आघाडी सरकार चांगलं काम करत असताना अनिल परबसारखे काही नेते जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहेत. यामुळे मला आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलावं लागलं. आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. ते याबाबत थोड्याफार सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल परब यांनी लक्षात घ्यावं की मला लोकांनी बहुमत दिलं आहे. त्यांनी त्यांचा पराभव मान्य करायला हवा. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे.

    दरम्यान, महाविकास आघाडीतील इतर नेतेही अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. सहकारी पक्षातील नेत्यांची कामे होत नसतील, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीने ठरवलेल्या कॉमन मिनिमम तत्त्वाला यामुळे हरताळ फासला जात असल्याचा आरोप होत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Shivsena Vs Congress Shivsena Minister Anil Parab obstructs Congress MLAs work, Zeeshan Siddiqui expresses pain on Twitter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO’s 7 : द फोकस एक्सप्लेनर : इस्रोचे 7 उपग्रह भारतीय लष्कराचे डोळे; पाक सैन्य तळासह अतिरेकी लाँच पॅडची अचूक माहिती

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याची धडक कारवाई रावळपिंडीपर्यंत पोहोचली, राजनाथ सिंहांनी प्रथमच उघडपणे सांगितली कहाणी!!

    IPL matches : इंग्लंडकडून IPL चे उर्वरित सामने आयोजित करण्याची ऑफर; भारत-पाक तणावामुळे लीग पुढे ढकलली, 16 सामने बाकी

    Icon News Hub