विनायक ढेरे
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्याचा झाल्याची घोषणा केली आहे. केवळ निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ही युती केलेली नसून भविष्यकाळात ही युती महाराष्ट्रात एकत्र कार्य करेल, असे उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी जाहीर केले आहे. दोन्ही संघटनांचा राजकीय मनसूबा तर उत्तम आहे. कारण संभाजी ब्रिगेड ब्रिगेडची सामाजिक संघटना जरी मजबूत असली तरी त्यांचा राजकीय पक्ष तेवढा मजबूत नाही आणि शिवसेना ठाकरे गट एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे क्षीण झाला आहे. त्यामुळे दोन सध्याच्या या दोन छोट्या शक्ती एकत्र आल्या तर त्यांच्यातच बेरजेचे राजकारण होऊन विशिष्ट शक्ती उभी राहील असा दोन्ही संघटनांच्या वरिष्ठांचा राजकीय होरा आहे. तो होरा गैर मानण्याचे कारण नाही. Shivsena Thackeray faction + Sambhaji brigade Alliance, beginning of end of Shivsena
पण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीचा महाराष्ट्रापुरता एवढाच राजकीय अर्थ आहे काय?? हा मात्र मूलभूत प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अजिबात तेवढाच मर्यादित अर्थ नाही हे आहे!! किंबहुना शिवसेनेचा ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे सध्या कागदावर अस्तित्वात असलेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विसर्जित झाली असाही नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस यांची जी मूलभूत राजकीय प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीची वेगवेगळी रूपे वेगवेगळ्या संघटनांच्या रूपांनी पुढे आली आहेत. त्यापैकी एका रूपाने शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती केली असा त्याचा राजकीय अर्थ आहे!!
राष्ट्रवादीकडून वैचारिक भरण पोषण
संभाजी ब्रिगेड ही संघटना राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिकतेशी जुळणारी आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडला सर्व प्रकारची रसद पुरवत असते हे उघड गुपित महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात गेली किमान दोन दशके तरी अस्तित्वात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या नव्या युतीचा अर्थ नेमका याच राजकीय संदर्भात समजून आणि तपासून घेतला पाहिजे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटामध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता गेल्यानंतर त्या पक्षात फारसे इन्कमिंग होत नाही. पण ठाकरे गट महाराष्ट्रापुरता याला “विशिष्ट अपवाद” ठरला आहे शिवसेनेच्या ठाकरे गटात सुषमा अंधारे या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रवेश कर्त्या झाल्या. त्याआधी लक्ष्मण हाके या नेत्याने देखील शिवसेनेतच प्रवेश केला. याचा नीट अर्थ समजवून घेतला तर सरळ सरळ राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने शिवसेनेत आपले नेते पाठवल्याचे स्पष्ट होत आहे.
आता संभाजी ब्रिगेडशी ठाकरे गटाने युती करणे ही पक्षामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा रसद पुरवठा करण्याच्या पलिकडची बाब आहे. म्हणजे शिवसेनेचा उरला सुरला ठाकरे गट देखील एक प्रकारे राजकीय दृष्ट्या विसर्जित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने ही तिसरी गाठली आहे.
बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर
शिवसेनेचा ठाकरे गट वैचारिक दृष्ट्या बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून केव्हाच दूर गेला आहे. यासाठी शिवसेनेला वैचारिक रसद पुरवठा राष्ट्रवादी अंकित विचारवंतांनी आधीच केला आहे. त्यासाठी प्रबोधनकार ठाकरे विरुद्ध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे वैचारिक द्वंद्व असल्याचे भासवले गेले आहे. त्याला सामाजिक सुधारणांच्या विचाराची डूब देण्यात आली आहे. मध्यंतरी काही साहित्यिक विचारवंत मातोश्रीवर जाऊन हजेरी देखील लावून आले आहेत. या सगळ्याची राजकीय दिशा शिवसेनेचा ठाकरे गट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून पूर्णपणे तोडून टाकण्याचीच आहे आणि मग उरलीसुरली संघटना उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर काढण्याचाच हा सरळ मनसूबा दिसतो आहे.
ठाकरे गटाला फायदा की तोटा??
भले शिवसेनेचा ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती मुंबई सह स्थानिक महापालिका निवडणुका अथवा जिल्हा परिषदा निवडणुका एकत्र लढवेल, कदाचित काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरेल राष्ट्रवादी आपल्या सोयीनुसार युती आघाडी करेल पण या सर्व निवडणुकांचे निकाल जेव्हा लागतील तेव्हा शिवसेनेच्या ठाकरे गट नेमका राजकीय ताकदीच्या दृष्टीने किती शिल्लक उरतो?? त्यांना निवडणुकीत संख्याबळात्मक किती यश मिळते?? शिवसेना 2019 मध्ये महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. आता ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर गेला आहे. महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर हा क्रमांक किती घसरतो की सावरतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे तिसरे पाऊल
शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीचा अर्थ एवढा गंभीर आणि खोल आहे. तो बाळासाहेब ठाकरे यांच्या जैविक वारसाचाही राजकीय अंत घडवून आणण्याची शक्यता आहे!! किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा तसा मनसूबा दिसतो आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची एकापाठोपाठ एक पावले त्याच दिशेने पडताना दिसत आहेत. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड युती हे त्याचे तिसरे पाऊल आहे.
Shivsena Thackeray faction + Sambhaji brigade Alliance, beginning of end of Shivsena
महत्वाच्या बातम्या
- गणेशोत्सव स्पेशल : पुण्यातून कोकणात जाण्यासाठी एसटीच्या 250 गाड्या!!
- अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले; छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर जे. जे. रुग्णालयात दाखल!!
- DRDO मध्ये बंपर भरती : 1 लाखापेक्षा जास्त पगार, 10वी पासदेखील करू शकतात अर्ज
- शिवसेना ठाकरे गट + संभाजी ब्रिगेड युती; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा