• Download App
    Shivsena splits : BJP gujrat president C. R. Patil helped eknath shinde and other Shivsena MLAs

    शिवसेनेला खिंडार : चमत्कारात मूळच्या जळगावच्या पाटलांचा मोठा वाटा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत जरी भाजपवर आगपाखड करत असले तरी एकनाथ शिंदे ज्यापद्धतीने मुंबईतून सुरतला पोहोचले आहेत आणि सुरत मध्ये त्यांची व्यवस्था ली मेरिडियन या हॉटेलमध्ये केली आहे. त्या सगळ्यांमध्ये जळगावच्या पाटलांचा हात आहे. Shivsena splits : BJP gujrat president C. R. Patil helped eknath shinde and other Shivsena MLAs

    हे जळगावचे पाटील म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे निकटवर्ती मानले जाणारे खासदार सी. आर. पाटील हे आहेत. सी. आर. पाटील हे मूळचे जळगावचे. परंतु त्यांचे सगळे राजकीय जीवन हे गुजरात मध्ये बहरले. सी. आर. पाटील हे सध्या गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. सुरत मध्ये ली मेरिडियन हॉटेल मधली सगळी व्यवस्था स्वतः पाटलांनी केल्याचे समजत आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत याच सी.आर. पाटील यांचा उल्लेख करून भाजपवर जोरदार आगपाखड केली आहे.

    – सूरतच्या हॉटेलमधील शिवसेना आमदारांना अहमदाबादला हलवणार; शहा – नड्डांची भेट

    सूरतच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या नाराज आमदारांना आता अहमदाबादला पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी नड्डा यांच्या घरी पोहचल्याचे समजते. दुसरीकडे वर्षावर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक थोड्याच वेळात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

    एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातला गेले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या 15 आमदारांचा समावेश आहे, तर 10 अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेत सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे शिंदे नाराज झाले असून, काल संध्याकाळपासून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव यांचा फोनही उचलला नाही. मुंबईत शिवसेनेने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे.

    – कोणते आमदार नॉट रिचेबल?

    1. शहाजी बापू पाटील

    2. महेश शिंदे सातारा

    3. भरत गोगावले

    4. महेंद्र दळवी

    5. महेश थोरवे

    6. विश्वनाथ भोईर

    7. संजय राठोड

    8. संदीपान भुमरे

    9. उदयसिंह राजपूत

    10. संजय शिरसाठ

    11. रमेश बोरणारे

    12. प्रदीप जैस्वाल

    13. अब्दुल सत्तार

    14. तानाजी सावंत

    15. सुहास कांदे

    – आकडेवारीचे गणित

    विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत 151 वर घसरले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 162 आमदार होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी ही संख्या 170 होती. म्हणजेच राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची संख्या 10 पेक्षा कमी झाली. विधान परिषदेनंतर एकूण 19 आमदार महाविकास आघाडीपासून दूर गेले. दुसरीकडे, भाजपला आता 134 आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार टिकण्यासाठी 144 चे बहुमत आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या आकड्यांमधील फरक खूपच कमी आहे.

    पक्षांतर बंदी कायदा

    विधानसभेत शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत. कायद्यानुसार शिंदे यांना 2/3 आमदार म्हणजे 37 आमदार जमवायचे असतील. सध्या शिंदे यांच्याकडे एकूण 29 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना आणखी 8 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

    का झाले नाराज?

    – डीपीवर शिंदेंचा फोटो

    बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. जय रायमूलकर यांनी काहीवेळापूर्वीच व्हॉट्सअॅपच्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे सांगितले जात आहे.

    – शंभुराज देसाईही सोबत

    महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील पाटणचे शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु तेही नॉट रिचेबल असून, एकनाथ शिंदे यांच्या समवेतच असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेसह मराठवाड्यातले सहा आमदार देखील नॉट रिचेबल आहेत. त्यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, संजय शिरसाट, माजी वनमंत्री संजय राठोड हेही नॉट रिचेबल आहेत.

    – वर्षावर ठाकरेंची बैठक

    विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार काठावर विजयी झाले आहेत. शिवसेना आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मते फुटल्याचेही समोर आले. त्यामुळे शिवसेना उमेदवार आमशा पाडवी आणि सचिन आहिर यांना प्रत्येकी 26 मते मिळाली. सोबतच एकनाथ शिंदे यांची नाराजी. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज वर्षांवर बैठक बोलावली आहे.

    राऊतांचा दिल्ली दौरा रद्द

    शिवसेना खासदार संजय राऊत हे आज दिल्लीला जाणार होते मात्र, एकनाथ शिंदे नाराज आहेत. तसेच आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक आहे. त्यामुळे राऊत यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्यासोबत मंत्री उदय सामंत यांचा देखील रत्नागिरी दौरा रद्द झाला असून, सामंत आणि राऊत आज मुंबईतच थांबणार आहेत.

    जळगावच्या पाटलांचा चमत्कार

    एकनाथ शिंदे यांची सूरतमध्ये सारी सोय सी. आर. पाटील यांनी केल्याचे समजते. पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून, त्यांचे गाव जळगाव जिल्ह्यातील पिंप्री अकारूत (ता. मुक्ताईनगर) आहे. ते सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे ते निकटवर्तीय असल्याचे समजते. त्यांचे शिक्षण आयटीआयपर्यंत झाले आहे. ते 1989 पोलिस कॉन्स्टेबल झाले. त्यानंतर समाजकार्य सुरू केले. समजाकारणासोबत राजकारण सुरू केले. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. या पाटील यांनीच शिंदेंची गुजरातमध्ये सारी सरबराई केल्याचे समजते.

    Shivsena splits : BJP gujrat president C. R. Patil helped eknath shinde and other Shivsena MLAs

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल