Shivsena MP Sanjay Raut : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या साप्ताहिक स्तंभात विविध चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामध्ये आपल्या ‘रोखठोक’ या सदरात मोदी-ठाकरे भेटीवर लिहून एकाच दगडात दोन पक्षी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत यांनी यापूर्वी काय घडलं, सध्या काय घडतंय आणि भविष्यात शिवसेनेचा कल कुठे असू शकतो, याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. Shivsena MP Sanjay Raut Writes About PM Modi CM Thackeray Meeting In Rokhthok column Of Saamana
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या साप्ताहिक स्तंभात विविध चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामध्ये आपल्या ‘रोखठोक’ या सदरात मोदी-ठाकरे भेटीवर लिहून एकाच दगडात दोन पक्षी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत यांनी यापूर्वी काय घडलं, सध्या काय घडतंय आणि भविष्यात शिवसेनेचा कल कुठे असू शकतो, याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे.
राऊत यांनी आपल्या लेखामध्ये मोदींशी असलेले चांगले संबंध प्रकर्षाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतीच त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील आघाडीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. राऊतांनी लिहिले की, दुसरा एक राजकीय संदेश राज्यातील तीन प्रमुख राजकीय पक्षांसाठी आहे. पीएम मोदींशी आपला उत्तम संवाद आहे, चिंता नसावी. राऊत यांच्या या वाक्यातच गुगली आहे. यातून मोदींशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर ही भेट कशी ठरली, मोदींनी लगेच कशी वेळ दिली हे सांगताना राऊत दिसतात.
कोणाच्याही मध्यस्थीशिवाय भेट झाली हे महत्त्वाचे
राऊत यांनी लिहिले की, “राज्याच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेट दिली, त्यात काय चूक आहे? परंतु नंतर पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाल्यामुळे बर्याच जणांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. कोणाच्या मध्यस्थीशिवाय मोदी-ठाकरे यांची बैठक झाली, हे महत्त्वाचे आहे.
ठाकरेंच्या सरकारला मोदी-शहांकडून अडथळे नाहीत
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन करताना मोदी-शाह यांनी कोणताही अडथळा आणला नाही, असेही राऊत यांनी लिहिले. ते म्हणाले, “जेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन केले जात होते, तेव्हा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अडथळे आणण्यात कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्याचा अर्थ महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना कधीच समजू शकला नाही.”
राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन नाही
संजय राऊत म्हणाले, ‘असा दावा केला जात आहे की अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला जाईल आणि महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडेल. या वादामुळे राज्यात नव्या राजकीय घटनांना वेग येईल. अशा दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. ‘पाच’ वर्षे मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन शिवसेनेला देण्यात आले आहे. मोदी-ठाकरे भेटीचा परिणाम सध्याच्या काळापेक्षा भविष्यासाठी चिंतेचा ठरला पाहिजे.
संजय राऊत यांचा मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Shivsena MP Sanjay Raut Writes About PM Modi CM Thackeray Meeting In Rokhthok column Of Saamana
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला भावनिक साद घालणाऱ्या नक्षलवाद्यांनाच खा. छत्रपती संभाजीराजेंचे प्रति आवाहन
- खतरनाक अपमान : चीन-अमेरिकेने नाकारली पाकिस्तानची ‘मॅंगो डिप्लोमसी’, भेट म्हणून दिलेले आंबे परत पाठवले
- अरे व्वा, कोरोनावर आणखी एक औषध ! ; हृदयरोगाच्या रुग्णांसाठी वापर शक्य
- देशात दिवसभरात ८४,३३२ कोरोनाचे रुग्ण; ४,००२ जणांचा मृत्यू ; ७०दिवसांतील नीचांक
- Fuel Price Hike दोन महिन्यात पेट्रोल सव्वाशे रुपये तर, डिझेलच शंभरी गाठणार, तज्ज्ञांचा अंदाज