शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये तणाव नाही, तिथं दहशतवाद पुन्हा सुरू झाला आहे. सरसंघचालक बोलले ते योग्यच आहे की ३७० कलम हटवूनही काही फरक पडलेला नाही. रोज लोकं मारली जात आहे. Shivsena MP Sanjay Raut criticized Modi Government Over Kashmir Target Killing Issue
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये तणाव नाही, तिथं दहशतवाद पुन्हा सुरू झाला आहे. सरसंघचालक बोलले ते योग्यच आहे की ३७० कलम हटवूनही काही फरक पडलेला नाही. रोज लोकं मारली जात आहे. गृहमंत्रालयाची जबाबदारीय केवळ पाकिस्तान का, चीनवर पण सर्जिकल स्ट्राईक करा. चीनपण लडाख, तवांगमध्ये घुसखोरी करत आहे.
भारत- पाकिस्तान सामन्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यावर आम्ही बोलणार नाही, रोज लोक मरतायत, केंद्र सरकारनं याबाबत ठोस भूमिका घ्यायला हवी. क्रिकेट खेळून, बंद करून काश्मीरची परिस्थिती बदलणार आहे का? पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नका. तुम्ही तिकडे जाऊन केक कापता. काश्मीरमधील परिस्थिती कधी समोर येऊच दिली नाही, तिथं अनेक निर्बंध होते. गृहमंत्र्यांनी समोर येऊन परिस्थिती स्पष्ट करायला हवी. ईडी, सीबीआय, एनसीबीला सीमेवर पाठवा, फार पॉवरफुल लोक आहेत. सोमय्यांनाही पाठवा, आम्ही देतो आतंकवाद्यांचे पेपर
ते पुढे म्हणाले की, चंद्रकांतदादांनी शरद पवारांवर ज्या भाषेत टीका केली, कुठे हिमालय आणि कुठे टेंगूळ? माझं महाविकास आघाडीतल सर्व मंत्र्यांना आवाहन आहे की, गप्प बसू नका. टीकेला प्रतिटीका करा, हे सारं बंद होईल.
Shivsena MP Sanjay Raut criticized Modi Government Over Kashmir Target Killing Issue
महत्त्वाच्या बातम्या
- भारत आणि बेने इस्रायलींची नाळ एकच
- केंद्र सरकार कायदा करून शेतकऱ्यांना एमएसपी गॅरंटी का देत नाही? मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल सिंग यांचा खोचक सवाल
- चीनची अर्थव्यवस्था संकटात, तिसऱ्या तिमाहीत जोरदार धक्का; रिअल इस्टेटमुळे आर्थिक प्रगतीत अडथळे
- काश्मिरातील टार्गेट किलिंगवर सत्यपाल मलिक यांचा संताप, म्हणाले, “मी राज्यपाल असताना अतिरेक्यांची हिंमत नव्हती!”
- केरळमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे हाहाकार, आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू, घरे पाण्यात वाहून गेली, 11 जिल्ह्यांसाठी अलर्ट