• Download App
    पटोलेंच्या वक्तव्यावर सत्तार म्हणाले, आमचीही स्वबळाची तयारी सुरू, भविष्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री । Shivsena Leader Abdul Sattar Answer To Nana Patole, Says We Also fight elctions on our OWN, CM From Shivsena in Future Also

    पटोलेंच्या वक्तव्यावर सत्तार म्हणाले, आमचीही स्वबळाची तयारी सुरू, भविष्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री

    Shivsena Leader Abdul Sattar : महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या वेगवान घडामोडी सुरू आहेत. सत्तेतील तिन्ही पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणाही केली आहे. एवढेच नव्हे, तर हायकमांडने आदेश दिल्यास मुख्यमंत्रिपदाचा चेहरा व्हायला आपल्याला आवडेल असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. Shivsena Leader Abdul Sattar Answer To Nana Patole, Says We Also fight elctions on our OWN, CM From Shivsena in Future Also 


    विशेष प्रतिनिधी

    जालना : महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या वेगवान घडामोडी सुरू आहेत. सत्तेतील तिन्ही पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणाही केली आहे. एवढेच नव्हे, तर हायकमांडने आदेश दिल्यास मुख्यमंत्रिपदाचा चेहरा व्हायला आपल्याला आवडेल असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

    येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, नगर परिषद निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली. यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने निवडणूक कशी लढायची हा त्यांचा प्रश्न असून आमचीही पालिका निवडणूक स्वबळावर लढायची तयारी सुरू असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. काँग्रेसला मुख्यमंत्रिपद हवं असेल, तर त्यांना सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील. मात्र भविष्यातदेखील शिवसेनेच्याच सर्वात जास्त जागा निवडून येणार असून उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.

    जालन्यात आज शिवसेनेचा वर्धापन दिन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कपाशी बियाणे आणि प्रत्येकी ७ हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मदतीचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

    Shivsena Leader Abdul Sattar Answer To Nana Patole, Says We Also fight elctions on our OWN, CM From Shivsena in Future Also

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित