विशेष प्रतिनिधी
मुंबई : मेळाव्यात व्यासपीठावर खुर्ची, दिसला दोन पक्षांमधला फरक!!, हे आज 21 सप्टेंबर 2022 रोजी जाणवले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडल्यानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर पडून गोरेगावातल्या नेस्को मैदानावर शिवसेनेचा मेळावा घेतला. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असताना देखील त्यांच्या नावाची खुर्ची या मेळाव्यातल्या व्यासपीठावर शिवसेना नेत्यांच्या रांगेत ठेवली होते. Shivsena firmly backs Sanjay Raut, but NCP politically ducked out Anil Deshmukh and Nawab Malik
संजय राऊत हे जरी 1034 रूपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असले तरी शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचा राजकीय संदेश उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावाची खुर्ची व्यासपीठावर ठेवून दिला आहे.
एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने संजय राऊत यांच्या पाठीशी उभे राहण्याचा राजकीय संदेश आज दिला असला, तरी काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या खुर्च्या व्यासपीठावर नव्हत्या. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नावाच्या खुर्च्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यासपीठावर नव्हत्या. हे दोन्ही नेते वेगवेगळ्या आरोपांखाली संजय राऊत यांच्यासारखेच तुरुंगात आहेत.
नवाब मलिक हे दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रींग केल्याप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मंत्रिपदावरून काढले नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे ठाकरे – पवार सरकार सत्तेवरून गेल्यानंतरच आपोआपच नवाब मलिक यांचे मंत्रीपद गेले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत मात्र नवाब मलिकांना स्थान मिळालेले नाही. त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते पदही टिकलेले नाही. अनिल देशमुख यांना देखील यांची देखील खुर्ची यांच्या नावाची देखील खुर्ची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात व्यासपीठावर नव्हती.
मात्र संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात असताना देखील त्यांचे शिवसेनेचे प्रवक्ते पद टिकून आहे. किंबहुना शिवसेना देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, हाच संदेश शिवसेनेने संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची व्यासपीठावर ठेवून दिला आहे.
Shivsena firmly backs Sanjay Raut, but NCP politically ducked out Anil Deshmukh and Nawab Malik
महत्वाच्या बातम्या
- श्रीनगरमध्ये तब्बल 30 वर्षा नंतर सिल्वर स्क्रीनवर आला सिनेमा; मल्टिप्लेक्सचा शुभारंभ!!
- महाराष्ट्रात आता वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणार स्थानांतर, हे आहे कारण
- द फोकस एक्सप्लेनर : ज्या हिजाबच्या वादात धुमसत आहे इराण, जाणून घ्या काय आहे त्याचा इतिहास, कशी सुरुवात झाली?
- महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला दिली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस