मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे.मात्र, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून संबंधित समाजाचे शैक्षणिक, सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्याबाबत अहवाल सरकारला देणे आवश्यक असल्याचे मत आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी
पुणे –राज्यातील मराठा समाज माेठया प्रमाणात शैक्षणिक व सामाजिक दृष्टया मागासलेला आहे. सर्वाच्च न्यायालयाचे आदेशामुळे मराठा समाजाचे आरक्षण संपुष्टात आले. राज्य मागासवर्ग आयाेगाने राज्यातील मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करुन समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्टया मागासलेला आहे हे सिध्द करुन त्याबाबतचा अहवाल राज्यशासनाला देणे आवश्यक आहे. याकरिता सरकार पुढाकार घेत नसल्याने शिवसंग्राम तर्फे राज्य मागासवर्ग आयाेगाला लेखी पत्र देऊन मागणी करण्यात येत असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Shivsangram party head vinayak Mete demanded Backward commission survey for Maratha cast
मेटे म्हणाले, राज्य सरकारला राज्यातील मागास समाजाला याेग्य प्रमाणात आरक्षण देण्याचे अधिकार आहे. मात्र, सदरील आरक्षण देण्यापूर्वी प्रत्येक राज्यातील मागासवर्गीय आयाेगाची भूमिका महत्वपूर्ण आहे. मागासर्वग आयाेगाकडून मराठा समाजाचा मागसलेपणाचा सखाेल अभ्यास व सर्वेक्षणाची गरज आहे व पूर्वीच्या आयाेगातील तृटी दूर करणे आवश्यक आहे.
उपलब्ध आकडेवारी व पुराव्यानुसार मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे कलम-१४ समानतेच्या तत्वाचे उल्लंघन करणारे नसून घटनेच्या मुळ गाभ्याला धरुन आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नार्केतेपणामुळे आणि पाठपुराव्या अभावी न्यायालयात रद्द झाले आहे.
आरक्षण देणे राज्यसरकारच्याच हातात
विनायक मेटे म्हणाले, मागासवर्ग आयाेगाच्या माध्यमातून मराठा समाज, आबीसी समाज मागसला आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिध्द करणे आवश्यक आहे. परंतु राज्यसरकार केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत असून मराठा समाजाची दिशाभूल करत आहे.
ओबीसींचे आरक्षणासाठी सर्मपित आयाेग नेमणे आवश्यक असताना कमिटी नेमली गेली त्यामुळे ती बिनकामी आहे. मागासवर्ग आयाेगाचे अध्यक्षासह सदस्य बदलून सरकारने लवकर समाजाचे सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आदाेलन करु असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Shivsangram party head vinayak Mete demanded Backward commission survey for Maratha cast
महत्त्वाच्या बातम्या
- उद्योगपतीने बायकोसोबत झोपायला सांगितले तहसीन पूनावाला यांचे खळबळजनक वक्तव्य
- Maharashtra Assembly Session : राज्य सहकारी बँकेला 380 कोटींचा नफा; फडणवीस सरकारचेही यात योगदान; अजितदादांकडून विधानसभेत स्तुती!!
- The Kashmir Files : काश्मीरमध्ये 399 हिंदू मेले, तर मुसलमान 15000 मेले; केरळ काँग्रेसचे ट्विट; ट्रोलनंतर मात्र डिलीट!!
- The Kashmir Files : खोटे “हाऊसफुल्ल” बोर्ड लावून गोवा, भिवंडीत धर्मांधांचा “फिल्म जिहाद”…!!