प्रतिनिधी
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य देखील त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झाले आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक प्रश्न पडतो, की छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आपले काय झाले असते?, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शताब्दी गौरव समारंभात काढले.shivsahir babasaheb purandare felicitaded on his 100 birth day, PM narendra modi parise him for his role in history writing
छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरुपाची आणि भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेबांना एवढी भक्ती आहे, असे पंतप्रधानांनी म्हणाले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी दिल्लीतून विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बाबासाहेबांनी जे योगदान दिले त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू.
त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावे यासाठी मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो, असा संदेशही मोदी यांनी दिला.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये बाबासाहेबांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, २०१५ मध्ये महाराष्ट्रभूषण पुसस्कार दिला. मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह सरकारने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परमभक्ताला कालिदास पुरस्कार देऊन गौरवले त्याच्या आठवणींना मोदींनी यावेळी उजाळा दिला.
मोदी म्हणाले, की बाबासाहेब त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत असतानाच भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करतोय. बाबासाहेबांनाही हा योगायोग म्हणजे त्यांना भारतमातेने दिलेला आशीर्वादच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेबांनी देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो आम्हाला कायमच प्रेरणा देत राहील.
तरुण इतिहासकारांनी बाबासाहेबांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. इतिहासाबरोबरच बाबासाहेबांनी वर्तमानाचीही काळजी घेतली, गोवा मुक्ती संग्रामापासून ते दादरा नगर हवेलीच्या संघर्षात त्यांचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गारही मोदींनी काढले.
shivsahir babasaheb purandare felicitaded on his 100 birth day, PM narendra modi parise him for his role in history writing
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत डेल्टा प्लस प्रकारामुळे पहिला मृत्यू, संपर्कात आलेले इतर दोन जणही पॉझिटिव्ह, आतापर्यंत 7 रुग्णांची नोंद
- आता राहुल गांधींची फेसबुक आणि इन्स्टाग्राम खातीही लॉक होणार? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची मागणी
- ऑक्सफोर्ड लसीमुळे रक्त गोठणे अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक, नव्या संशोधनात दावा
- ट्विटर पक्षपाती, सरकारच्या दबावाखाली; विरोधकांचा आवाज दाबला तर ट्विटरच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो; राहुल गांधींचा ट्विटरवर हल्लाबोल
- परमबीर सिंहांच्या अडचणीत पुन्हा वाढ, पोलिसांनी जारी केली लुकआऊट नोटीस, बनावट केसद्वारे कोट्यवधी उकळल्याचा आरोप