• Download App
    शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास रोखला म्हणून अटक : आव्हाड; हा तर आव्हाडांचा कांगावा : फडणवीस Shivaji Maharaj was arrested for preventing the wrong history

    शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास रोखला म्हणून अटक : आव्हाड; हा तर आव्हाडांचा कांगावा : फडणवीस

    प्रतिनिधी

    मुंबई : सिनेमागृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा खेळ बंद करताना प्रेक्षकांना मारहाण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु नंतर कोर्टाने त्यांची 15000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर काही अटी शर्तीवर सुटका केली. Shivaji Maharaj was arrested for preventing the wrong history

    त्यानंतर पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला शिंदे फडणवीस सरकारने सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हर हर महादेव या सिनेमात खोटा दाखवला आहे. तो रोखला म्हणून आपल्याला अटक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.



    मात्र आव्हाड यांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही प्रकरणाचा कांगावा करण्याची सवयच आहे. त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात घुसून जो तमाशा केला आणि प्रेक्षकांना मारहाण केली. कायदा हातात घेतला म्हणून त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक केली. महाराष्ट्रात कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अशीच कायदेशीर कारवाई होईल, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    Shivaji Maharaj was arrested for preventing the wrong history

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Uday Samant : हिंदी सक्तीचे धोरण उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातले; आदित्य ठाकरेंकडूनही पाठराखण, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

    Thackeray Brothers : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक; 5 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे धरणे आंदोलन

    Babanrao Lonikar : बबनराव लोणीकर यांना उपरती : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समजावणीनंतर शेतकऱ्यांविरोधात न बोलण्याची ग्वाही