विशेष प्रतिनिधी
इंट्रो :पूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणानंतर शिवसेनेच्या संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. आता एका महिलेने त्यांच्यावर शोषणाचा गंभीर आरोप केला आहे.Shiv Sena’s Sanjay Rathore still free? Chitra Wagh’s attack on the government
यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या की, शिवसेनेच्या संजय राठोडवर आणखी एक गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतानाही अजूनही
कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत? तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहातोय? अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.