• Download App
    शिवसेनेची आहे नारायण राणेंची भाषा l TheFocus India|Shiv Sena's language is Narayan Rane's l TheFocus India

    WATCH : शिवसेनेची आहे नारायण राणेंची भाषा l TheFocus India

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे चारोळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता नारायण राणे आणि शिवसेना संघर्षावर चारोळी केली आहे.Shiv Sena’s language is Narayan Rane’s l TheFocus India

    ‘शिवसेनेची आहे नारायण राणे यांची भाषा,

    आता महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा. आता या लोकांकडून, सरकारकडून लोकांना नाही आशा, म्हणून नारायण राणेकडून पाहायला मिळते तुम्हाला अशी भाषा ‘ अशी नवी चारोळी रचून शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्षावर मार्मिक टिप्पणी केली आहे.



    तसेच महाविकास आघाडी सरकारने चांगले काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक घटनेवर यमक जुळवून ते चारोळी रचतात. अनेक वर्षांपासून त्यांना अशा चारोळ्या रचण्याचा छंद आहे. विशेष म्हणजे त्याचा आनंद अनेकजण घेतात.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपची राजवट आल्यानंतर आठवले यांना सलग दोन वेळा मंत्रिपद देण्यात आले. यापूर्वी ते काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे घटक होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या राजवटीत काँग्रेस विशेषतः राष्ट्रवादीने मंत्रीपदासाठी झुलवत ठेवले होते.

    अखेर आघाडीतील राजकारणाला कंटाळून ते भाजप प्रणित लोकशाही आघाडीचे घटक बनले. मंत्रिपदाबरोबर चारोळ्या राचण्याचा त्यांनी मनमुराद असा आनंद लुटला. तसेच त्या चारोळ्यांनी अनेकांचा आनंद द्विगुणित केला आहे. एका क्षणात चारोळ्या राचण्याचा त्यांचा हातखंडा आहे.

    Shiv Sena’s language is Narayan Rane’s l TheFocus India

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका