• Download App
    शिवसेनेची अमानुष दादागीरी! नालेसफाई कंत्राटदारावर नाल्यातील घाण ; शिवसेना आमदार दिलीप लांडेंचा प्रताप ; नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच काय? Shiv Sena's inhuman behavior! Nala dirt on contractor; by Shiv Sena MLA Dilip Lande; What about the corrupt leaders in BMC

    शिवसेनेची अमानुष दादागीरी ! नालेसफाई कंत्राटदारावर नाल्यातील घाण ; शिवसेना आमदार दिलीप लांडेंचा प्रताप ; नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच काय?

    • शिवसेना महापालिकेत सत्तेत आहे. दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जातो. आज शिवसैनिक रस्त्यावरुन येऊन कंत्राटदाराला मारहाण करत आहेत. खरी मारहाण त्यांनी नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना केली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रीया सर्वच स्तरांतून उमटत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्यानंतर नालेसफाईवरुन जोरदार गोंधळ सुरू होतो . राजकारण देखील तापतं .आता यंदा तर गेल्या ४ दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. आजही शहरातील अनेक भागांमध्ये नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही. चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कंत्राटदाराच्या अंगावर कचरा टाकत त्यांना अमानुष वागणूक दिली . Shiv Sena’s inhuman behavior! Nala dirt on contractor; by Shiv Sena MLA Dilip Lande; What about the corrupt leaders in BMC

     

    या नालेसफाईचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याला त्या ठिकाणी बोलावून आमदारांनी चक्क त्याच नाल्याच्या कचऱ्यात बसवले. जनतेचा त्रास त्याला कळवा म्हणून असे केल्याचे ते यावेळी सांगत होते. मात्र यामुळे एकीकडे महापौर संपूर्ण नालेसफाई झाल्याचे सांगत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आमदरानेच कंत्राटदाराला नाल्याच्या तुंबलेल्या कचऱ्यात बसवले.

    चांदीवली भागातील अनेक ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. ज्यामुळे गेल्या ४ दिवसांत या भागात पाणी साचलं. त्यामुळे संतापलेल्या दिलीप लांडे यांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन कंत्राटदाराच्या माणसाला रस्त्यावर बसवून त्याच्या अंगावर कचरा टाकला.

    आमदार लांडे यांचा हा प्रताप सोशल मीडियावर नंतर चांगलाच व्हायरल होतो आहे.राज्यात शिवसेना महापालिकेत सत्ताधारी शिवसेनाच मग कंत्राट देणार्या नेत्यांच काय? त्यांना देखील असेच कचर्यात बसवणार का?असा संताप व्यक्त केला जात आहे.

    मी या मतदार संघाचा आमदार आहे. नालेसफाईची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ती लोकं इथे येत नाहीत. लोकांनी विश्वास ठेवून मला आमदार म्हणून निवडून दिलंय. नालेसफाईचं कंत्राट ठेकेदाराला देण्यात आलंय, पण त्याने आपलं काम केलं नाही म्हणून मला रस्त्यावर उतरुन गटार साफ करावं लागतंय. माझ्या मतदार संघातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जो त्रास माझ्या मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागला तो त्रास कंत्राटदाराला झाला पाहिजे म्हणून मी हे काम केल्याचं आमदार दिलीप लांडेंनी सांगितलं.

     

    Shiv Sena’s inhuman behavior! Nala dirt on contractor; by Shiv Sena MLA Dilip Lande; What about the corrupt leaders in BMC

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!