विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली. मात्र, शिवसेना सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Shiv Sena’s helplessness was seen in 2019, won the election with a Modi photo, went out for power, Devendra Fadnavis’s attack
फडणवीस म्हणाले की, एमआयएमसोबत जावे किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचे लोकं आज जनाब बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत, अजान स्पर्धा घेत आहेत. राष्ट्रीय प्रश्नावर ते मोदींना विरोध करत आहेत. 370 कलम हटवले तेव्हा संपूर्ण देश एक होता, तेव्हा हे विरोध करत होते. त्यांना इतिहास माहिती नाही, 370 कलम हटवणारी भाजप आहे, राम मंदिर बांधणारी भाजप आहे, लाल चौकात तिरंगा लावायला शिवसेना नव्हती गेली भाजप गेली होती.
दरम्यान यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेना हिंदुत्ववादी होती आणि राहिल. शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये भेसळ नाही. एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती कदापीही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Shiv Sena’s helplessness was seen in 2019, won the election with a Modi photo, went out for power, Devendra Fadnavis’s attack
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले भारातच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक
- NCP – AIMIM Alliance : एमआयएमशी आघाडीचा निर्णय महाराष्ट्र पातळीवर होऊ श
- The Kashmir Files : शरद पवारांकडून फारुख अब्दुल्लांची पाठराखण; सिनेमावर सामाजिक वातावरण बिघडविण्याचा आरोप!!
- गोवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २३ ते २५ मार्च दरम्यान
- Goa Dr. Pramod Sawant : भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; डॉ. प्रमोद सावंतांचे मुख्यमंत्रीपदाचे सूतोवाच