• Download App
    किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक|Shiv Sena's attack on Kirit Somaiya Former Mayor Vishwanath Mahadeshwar arrested

    किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक

    प्रतिनिधी

    मुंबई : राणा दाम्पत्य यांना मातोश्री येथे हनुमान चालीसा म्हणण्यापासून प्रतिबंध करण्याकरता शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घरासमोर राडा केला. पोलिसांनी अखेर राणा दाम्पत्य यांना अटक केली. त्यांना जेव्हा खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तेव्हा तिथे भाजपचे नेते किरीट सोमय्या भेटायला गेले, त्यावेळी सोमय्या यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली. तसेच हाजी आलम, शेखर वायंगणकर आणि दिनेश कबुल यांनाही ताब्यात घेण्यात आले.Shiv Sena’s attack on Kirit Somaiya Former Mayor Vishwanath Mahadeshwar arrested

    जेव्हा किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याना भेटायला गेले, त्यावेळी तिथे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. जेव्हा सोमय्या तेथून निघून जायला निघाले, तेव्हा मात्र शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, तसेच बाटल्या फेकल्या, त्यावेळी सोमय्या यांच्या गालावरून रक्त वाहताना दिसत होते. मात्र याविषयी शिवसेनेच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. सोमय्या यांच्या गालावर वाहणारे रक्त खरेच होते का?, याची पोलीस चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे



    या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्या दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांना भेटून हल्ल्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर काही तासांतच माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या हल्ल्याच्या प्रकरणात शिवसेनेची जबाबदारी स्पष्ट झाली आहे की आणखी काही हे आई काळानंतर समजू शकेल.

    Shiv Sena’s attack on Kirit Somaiya Former Mayor Vishwanath Mahadeshwar arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Satara Gazetteer : ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू होणार; मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयातील बैठकीत आरक्षणाचा आढावा

    Girish Mahajan : अनावधानाने चूक, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका, प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

    Bombay High Court : हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार; प्रदूषणाची सर्व आकडेवारी सार्वजनिक करण्याचे मुंबई HCचे आदेश