प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेल्या उठावानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही एक मोठी घडामोड असल्याचे म्हटले जात आहे. ही नवी युती महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार आहे. Shiv Sena Thackeray Group Sambhaji Brigade Alliance; Announcement in the presence of Uddhav Thackeray on Matoshree
उद्धव ठाकरेंनी केले स्वागत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते सुभाष देसाई यांनी संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे आणि ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. संभाजी ब्रिगेडच्या मुख्य प्रवक्त्यांनी आपण शिवसेनेला समर्थन देत असल्याची जाहीर घोषणा केली आहे. महाराष्ट्रात यापुढे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन काम करतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडचे स्वागत केले आहे. आपण सर्वजण शिवप्रेमी आहोत त्यामुळे आपण दोघं एकत्र येऊन नवा इतिहास घडवूया, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रादोशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती
प्रादेशिक अस्मिता आणि संविधान टिकवण्यासाठी आपण संभाजी ब्रिगेडशी युती करत आहोत. आजवर दुहीच्या शापाने आमचा घात केला. ही युती केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आलेली नाही. पण आगामी काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे सांगण्यात येत आहे.
Shiv Sena Thackeray Group Sambhaji Brigade Alliance; Announcement in the presence of Uddhav Thackeray on Matoshree
महत्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये सत्तासंकट : मुख्यमंत्री सोरेन यांची आमदारकी रद्द, तरीही पुन्हा तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता
- मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- महाराष्ट्राच्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ!!
- महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ठाकरे सरकारचा प्रभाग पुनर्रचनेचा डाव; फडणवीसांचा गौप्यस्फोट