• Download App
    मुंबईत शिवसेना आमदाराचा घरासाठी म्हाडाकडे अर्ज, म्हणाले - भाड्याने राहणे परवडत नाही!!Shiv Sena MLA's application to MHADA for house in Mumbai, said - It is not affordable to live in rent !!

    मुंबईत शिवसेना आमदाराचा घरासाठी म्हाडाकडे अर्ज, म्हणाले – भाड्याने राहणे परवडत नाही!!

    म्हाडाने कोकण मंडळातून 8984 घरांची लॉटरी जाहीर केली आहे.या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घऱाचं स्वप्न पूर्ण करत आहेत.Shiv Sena MLA’s application to MHADA for house in Mumbai, said – It is not affordable to live in rent !!


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : म्हाडा (MHADA) आणि सिडकोने (CIDCO) अल्प किमतीत नागरिकांना घर उपलब्ध करुन देण्याच्या योजना आणल्या. कारण मुंबईत घरांच्या किमती प्रचंड असल्याने सर्वसामान्यांना सहजासहजी महानगरात घर खरेदी करणं परवडत नाही. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घऱाचं स्वप्न पूर्ण करत आहेत.

    म्हाडाने कोकण मंडळातून 8984 घरांची लॉटरी जाहीर केली आहे.यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी झाली आहे की , घरांच्या वाढत्या किमती किमतींमुळे सामान्य नागरिकच नाही तर सत्ताधारी शिवसेनेच्या आमदाराने देखील म्हडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज केला आहे.



    कोण आहेत म्हडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करणारे शिवसेना आमदार –

    पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांनी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज केला आहे. यासंबधित सर्व माहिती squarefeatindia.com ने दिली आहे. म्हाडाच्या घरांसाठीच्या लॉटरीत खासदार आणि आमदारांसाठी एक विशेष कोट्या अंतर्गत घरे राखीव आहेत. त्या अंतर्गतच आमदार श्रीनिवास वनगा यांनी घरासाठी अर्ज केला आहे. वनगा यांनी दोन योजनांमध्ये अर्ज केला आहे यामध्ये ठाण्यातील एका योजनेत तर दुसरा अर्ज हा नवी मुंबईतील घरासाठी केला आहे.आमदार वनगा यांनी ज्या घरांसाठी अर्ज केला आहे त्यापैकी एक घर घणसोली येथे आहे. जे 41.93 स्क्वेअर मीटर असून त्याची किंमत 20.70 लाख रुपये इतकी आहे.

    काय म्हणाले शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा-

    आमदार श्रीनिवास वनगा म्हणाले की ज्या ज्या वेळी मला मुंबईला येतो तेव्हा भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहावं लागतं. कारण मुंबईत आमदार हॉस्टेल नाहीयेत.दरम्यान मुंबईतील अपार्टमेंटचे भाडे 1 लाख रुपयांपर्यंत जाते, जे मला परवडत नाहीये. त्यामुळे मुंबईच्या आसपास मी घर शोधत आहे.”

    पुढे वनगा म्हणाले की मी असे घर शोधत आहे जे मुंबईपासून जवळ असेल आणि मंत्रालय-विधानसभेत पोहचायला थोडाच कालावधी लागेल .आमदार श्रीनिवास वनगा म्हणाले की , मी पालघर जिल्ह्यातील टोकाला म्हणजेच गुजरातच्या सीमेच्या जवळ राहतो आणि ठाण्यात पोहोचण्यासाठी जवळपास तीन तास लागतात.

    Shiv Sena MLA’s application to MHADA for house in Mumbai, said – It is not affordable to live in rent !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार