आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. गावात असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करू, असं वादग्रस्त विधान केलं आहे. Shiv Sena MLA Sanjay Gaikawad Controvercial Comment on Atrocity Act in Buldana
विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार गायकवाड यांनी ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. गावात असे हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करू, असं वादग्रस्त विधान केलं आहे.
आ. संजय राठोड यांचं वादग्रस्त वक्तव्य
खामगावातील वाघ कुटुंबावर 19 जून रोजी हल्ला झाला होता. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून चितोडा येथील गावगुंड पोत्या ऊर्फ रमेश हिवराळे याने गावात दहशत निर्माण केली आहे. बुधवारी चितोडा गावात आ. संजय गायकवाड यांनी भेट दिली. हल्ला झालेल्या वाघ कुटुंबाला आम्ही तुमच्यासोबत आहोत. घाबरण्याची गरज नाही, अशा शब्दांत धीर दिला. त्यांना धीर देत असतानाच गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात संबंधितांना सरळ करेन. अन्याय सहन करू नका, कायदा ठेचत नसेल तर आपण ठेचा. सगळी शस्त्र अस्त्र, सर्व ताकद पुरवीन, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं.
Shiv Sena MLA Sanjay Gaikawad Controvercial Comment on Atrocity Act in Buldana
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे हादरलं! नवविवाहित डॉक्टर दांपत्याची आत्महत्या, आधी पत्नीने, दुसऱ्या दिवशी पतीने घेतला गळफास
- कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या बाजूने नाहीत शरद पवार, म्हणाले – आक्षेप असलेल्या भागात सुधारणा व्हावी!
- अंमलबजावणी संचालनालयाचे प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंना समन्स, मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- ‘राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे वाटत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच’, भाजपवर शिवसेनेची चौफेर टीका
- राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरेंचे डॉक्टरांना पत्र, ‘येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे’