प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसेना-भाजप युती करायची की नाही याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत. अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदी असताना याबाबत विधाने करू नयेत. त्यांना तो अधिकार नाही, अशा कडक शब्दात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना सुनावले आहे. Shiv Sena-BJP alliance right Modi – Thackeray
अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांचे राजकीय मतभेद फार जुने आहेत. सत्तार काँग्रेसमध्ये असल्यापासूनचा त्याला इतिहास आहे. याचा संदर्भ देखील चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्यात आला आहे. अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत, असा टोलाही चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे ठाकरे परिवाराची उत्तम संबंध आहेत. शिवसेना-भाजप युतीची खिल्ली त्यांच्याच हातात आहे, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी काल केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजपच्या युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ज्यांना अधिकारच नाही. त्या अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत विधाने करुन संभ्रम फैलावू नये, असे चंद्रकांत खैरे यांनी त्यांना सुनावले आहेत.