• Download App
    शिर्डी : काकड आरतीला प्रवेश नाही ! साईबाबांच्या दर्शनासाठीच्या नियमावलीमध्ये बदल-भक्तांना पहाटे 6 ते रात्री 9 पर्यंतच घेता येणार दर्शन; वाचा सविस्तर|Shirdi: Kakad Aarti has no access! Changes in the rules for Sai Baba's darshan - Devotees can take darshan only from 6 am to 9 pm; Read detailed

    शिर्डी : काकड आरतीला प्रवेश नाही ! साईबाबांच्या दर्शनासाठीच्या नियमावलीमध्ये बदल-भक्तांना पहाटे ६ ते रात्री ९ पर्यंतच घेता येणार दर्शन; वाचा सविस्तर

    साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी


    विशेष प्रतिनिधी

    शिर्डी : साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता भक्तांना  सकाळी सहा ते रात्री नऊ याचदरम्यान साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. Shirdi: Kakad Aarti has no access! Changes in the rules for Sai Baba’s darshan – Devotees can take darshan only from 6 am to 9 pm; Read detailed

    राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट निर्माण होत आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात  नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता भक्तांना  सकाळी सहा ते रात्री नऊ याचदरम्यान साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.



    नवी नियमावली-

    जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार आता भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ याच कालावधीमध्ये साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.

    रात्री नऊ नंतर राज्यात जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत, जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मंदीर दर्शनासाठी बंद असेल.पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीला देखील भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही.  मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच काकड आरती होणार आहे.

    तसेच मंदिर परिसरात भक्तांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन देखील मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    Shirdi: Kakad Aarti has no access! Changes in the rules for Sai Baba’s darshan – Devotees can take darshan only from 6 am to 9 pm; Read detailed

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा