प्रतिनिधी
मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरातील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील एकत्र आले होते. अर्थातच त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. Shinde – Pawar – Patil together at Maratha Mandir Amrit Mahotsava program in Mumbai
पण शरद पवारांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणानुसार मुख्यमंत्री मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि उदय सामंत हे देखील होते, तसेच काँग्रेसचे नेते भाई जगताप या कार्यक्रमाला हजर होते. मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकत्र जमल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. विशेषता पाटण्यात विरोधी पक्षांच्या एकजुटीची बैठक झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने त्याची वेगळी चर्चा झाली. पण या कार्यक्रमात राजकारणापलीकडे चर्चा झाल्याचे अनेकांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात एका उद्दात हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली होती. संस्था अनेक निर्माण होतात, पण सातत्याने आणि तळमळीने जी संस्था काम करते तिचे कौतुक होणे गरजेचे असते. ज्या प्रकारे या संस्थेचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे ही निश्चितच गौरवाची बाब आहे. समाजाचा विश्वास संपादन करून, आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी या संस्थेने केली. मराठा मंदिर सारख्या संस्थांनी महाराष्ट्राचे शैक्षणिक विश्व समृद्ध केले.
याप्रसंगी मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, संजय राणे, शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यांच्यासह मराठा मंदिर या संस्थेचे सर्व विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Shinde – Pawar – Patil together at Maratha Mandir Amrit Mahotsava program in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- PM Modi Egypt Visit: पंतप्रधान मोदींच्या स्वागतावेळी इजिप्तशियन तरुणींने गायलं ‘शोले’ चित्रपटातील ‘हे’ गाणं!
- साथीच्या आजाराशी संबंधित मुंबई महापालिकेने केलेले 4000 कोटींचे करार ईडीच्या स्कॅनर खाली!!
- पंतप्रधान मोदी इजिप्त दौऱ्यावर; कैरो विमानतळावर ‘’गार्ड ऑफ ऑनर’’ने स्वागत!
- पाटणा बैठकीचा फ्लॉप शो; ना नेता निवड, ना संयोजक जाहीर; नुसती तारीख पे तारीख!!